सान्या मल्होत्रा लवकरच अडकणार लग्नबेडीत? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:39 IST2025-01-28T17:38:37+5:302025-01-28T17:39:41+5:30

Sanya Malhotra : अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​लवकरच 'मिसेस' चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Will Sanya Malhotra get married soon? The actress revealed... | सान्या मल्होत्रा लवकरच अडकणार लग्नबेडीत? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली...

सान्या मल्होत्रा लवकरच अडकणार लग्नबेडीत? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली...

अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​(Sanya Malhotra) चित्रपट 'मिसेस' (Mrs Movie)मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म झी५ वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सान्या गृहिणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. लग्नानंतर तिचे आयुष्य कसे बदलते ते या चित्रपटात दाखवले आहे. हा चित्रपट द ग्रेट इंडियन किचन या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

सध्या सान्या मल्होत्रा मिसेस या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलिकडेच एका मुलाखतीत सान्याने तिच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल सांगितले. एचटी सिटीशी बोलताना ती म्हणाली की, 'नाही, माझ्याकडे सध्या लग्नासाठी वेळ नाही. मी माझ्या कामात व्यग्र आहे. माझ्याकडे सुट्टी घ्यायलाही वेळ नाही.

ऋषभ रिखीराम शर्मा सान्याचे जोडले गेले होते नाव
सान्या मल्होत्राचे सितार वादक ऋषभ रिखीराम शर्मासोबत लिंकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. ते अनेकवेळा एकत्र स्पॉट झाले होते. मात्र, त्या दोघांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हॉलिवूडमध्ये जाणार सान्या मल्होत्रा ​​
याशिवाय सान्याला हॉलिवूडमध्ये काम करण्याचा विचार आहे का, असे विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, 'हॉलिवूडबाबत माझा कोणताही विचार नाही. मला कामातून थोडा वेळ काढून सुट्टीवर जायचे आहे एवढेच. बीच सुट्टीवर. त्यामुळे ग्लोबलबद्दल माहिती नाही. या चित्रपटाने आम्ही जागतिक पातळीवरही गेलोय.

वर्कफ्रंट
सान्याने 'दंगल'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती बबिता कुमारीच्या भूमिकेत होती. यानंतर ती पटाखा, बधाई हो, फोटोग्राफ, शकुंतला देवी, कथल, जवान, सॅम बहादूर, बेबी जॉन या चित्रपटांमध्ये दिसली. आता ती सनी संस्कारी की तुलसी कुमारी, ठग लाइफ आणि अनुराग कश्यपच्या अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Will Sanya Malhotra get married soon? The actress revealed...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.