शुबमन गिल-सारा तेंडुलकरच्या नात्याबद्दल प्रसिद्ध क्रिकेटरचा मोठा खुलासा, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 14:29 IST2023-11-09T14:28:55+5:302023-11-09T14:29:35+5:30
एका क्रिकेटरने शुबमन गिलला गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं आहे. साराबाबतही त्याने मोठा खुलासा केला आहे.

शुबमन गिल-सारा तेंडुलकरच्या नात्याबद्दल प्रसिद्ध क्रिकेटरचा मोठा खुलासा, म्हणाला...
क्रिकेटर शुबमन गिल मैदानावरील खेळीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत आहे. त्याचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि सारा तेंडुलकर या दोघींबरोबर जोडलं गेलं होतं. पण, शुबमन नक्की कोणत्या साराला डेट करत आहे, याबद्दल चाहत्यांनाही उत्सुकता होती. कॉफी विथ करणमध्ये साराने शुबमन गिलला डेट करत नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर शुबमन गिल सारा तेंडुलकरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आता लोकप्रिय क्रिकेटरने त्यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केलं आहे.
युएईचा क्रिकेटर चिराग सुरीने शुबमन गिल आणि साराबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मुलाखतीत शुबमन लवकरच लग्न करणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. "कोणता क्रिकेटर लग्न करेल?" असा प्रश्न त्याला मुलाखतीत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्याने शुबमन गिलचं नाव घेतलं. शुबमनला गर्लफ्रेंड असल्याचा खुलासाही त्याने केला.
तो म्हणाला, "शुबमन गिलला गर्लफ्रेंड आहे. सचिन तेंडुलकरची मुलगी साराला तो डेट करतोय." त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरीने शुबमन आणि साराबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या रिलेशनशिपबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. सारा खाननेही कॉफी विथ करणमध्ये "सारा का सारा दुनिया गलत सारा के पिछे पडा है" असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे शुबमन सारा तेंडुलकरला डेट करत असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे.