‘Koffee With Karan 8’ ची तयारी सुरू, 'पठाण' शाहरुख खान असणार पहिला 'गेस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 06:40 PM2023-02-05T18:40:39+5:302023-02-05T18:47:45+5:30

Koffee With Karan 8 : होय, ‘कॉफी विद करण’चा 8 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. खास बात म्हणजे, 8व्या सीझनचा पहिला गेस्टही ठरलाय.

Will Shah Rukh Khan return on Karan Johar Koffee With Karan 8? | ‘Koffee With Karan 8’ ची तयारी सुरू, 'पठाण' शाहरुख खान असणार पहिला 'गेस्ट'

‘Koffee With Karan 8’ ची तयारी सुरू, 'पठाण' शाहरुख खान असणार पहिला 'गेस्ट'

googlenewsNext

करण जोहरचा (Karan Johar) लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विद करण’चा (Koffee With Karan ) सातवा सीझन प्रचंड गाजला होता. 7 व्या सीझनमध्ये एकूण 12 एपिसोड होते आणि या 12 एपिसोड्समध्ये 26 सेलिब्रिटींनी पर्सनल लाईफबद्दलचे शॉकिंग खुलासे केले होते. आता आम्हाला अचानक ‘कॉफी विद करण’ची आठवण का व्हावी? तर या शोचा 8 वा सीझन लवकरच येतोय. होय, ‘कॉफी विद करण’चा 8 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. खास बात म्हणजे, 8व्या सीझनचा पहिला गेस्टही ठरलाय. किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan ) ‘कॉफी विद करण 8’चा पहिला गेस्ट असणार आहे.

शाहरूख खान ‘कॉफी विद करण’च्या 7 व्या सीझनमध्ये सामील झाला नव्हता.  त्याची कसर त्याची पत्नी गौरी खानने भरून काढली होती. पण ‘कॉफी विद करण 8’मध्ये खुद्द बादशाह सामील होणार आहे. सध्या एसआरके ‘पठाण’चं यश सेलिब्रेट करतोय. ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे तब्बल चार वर्षांनंतर शाहरूख मोठ्या पडद्यावर परतला. त्याचं कमबॅक जबरदस्त यशस्वी ठरलं. ‘पठाण’ गेल्या 25 जानेवारीला प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. ‘पठाण’नंतर ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे शाहरूखचे दोन सिनेमे येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत. साहजिकच किंगखानचे चाहते सुपर एक्साईटेड आहेत. अशात करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 8’मध्येही तो येणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2004 साली ‘कॉफी विद करण’च्या पहिल्या सीझनमध्ये शाहरूख व काजोल हे दोघे गेस्ट म्हणून सहभागी झाले होते. 2005मध्येही तो या शोमध्ये सहभागी झाला होता. सीझन 2, सीझन 5 मध्ये तो शोमध्ये आला होता.

म्हणून ‘कॉफी विद करण 7’मध्ये आला नव्हता शाहरूख...!!
‘कॉफी विद करण 7’मध्ये शाहरूख येणार अशी चर्चा होती. पण त्याने या सीझनमध्ये येणं टाळलं होतं. करण जोहरने शाहरूख न येण्यामागचं कारण सांगितलं होतं. पठाणच्या रिलीजआधी शाहरूख स्वत:ला पब्लिकपासून दूर ठेवू इच्छित होता. त्याने स्वत:ला पठाणसाठी राखून ठेवलं आहे, त्यामुळे तो‘कॉफी विद करण 7’मध्ये येणार नाही, असं करण जोहर म्हणाला होता.
 

Read in English

Web Title: Will Shah Rukh Khan return on Karan Johar Koffee With Karan 8?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.