दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला शाहरुख खान जाणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 11:17 AM2018-07-03T11:17:11+5:302018-07-03T11:27:29+5:30

बॉलिवूडचे हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या बी टाऊनमध्ये सुरु आहे.

Will Shahrukh Khan go to the wedding of Deepika Padukone and Ranveer Singh? | दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला शाहरुख खान जाणार का ?

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला शाहरुख खान जाणार का ?

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच दीपिका तिची आई उजाला यांच्यासोबत एका ज्वेलरी शॉपमध्ये दिसली होती.

बॉलिवूडचे हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या बी टाऊनमध्ये सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार हे लव्हबर्ड या वर्षाच्या अखेरिस लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. अनुष्का आणि विराटनंतर हे कपल सुद्धा इटलीमध्ये लग्न करणार आहेत. दीपिका आणि रणवीर स्वित्झर्लंडमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा होती. रणवीर स्विझ टुरिझमचा भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर असल्यानं या दोघांचं लग्न स्वित्झर्लंडमध्ये होणार असल्याची चर्चा होती  मात्र आता हे दोघे इटलीमध्ये लग्न करणार असल्याची माहिती मिळतेय. ऐवढेच नाही तर दोघांच्या घरी लग्नाची शॉपिंगसुद्धा सुरू झाली आहे. या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये रणवीर आणि दीपिकांच्या कुटुंबीयांसोबत इंडस्ट्रीमधील काही जवळचे मित्र-मौत्रिणीसुद्धा सामील होणार आहेत. सूत्रांच्या माहिती नुसार दीपिका आणि रणवीरला एक छोटीशी सेरेमनी करायची इच्छा आहे.दीपिकाच्या लग्नाला बॉलिवूडमधील कोण-कोण कलाकार हजेरी लावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अर्जुन कपूर आणि शाहरुख खान दीपिका-रणवीरचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे हे दोघे इटलीला लग्नाला जाण्याची शक्यता आहे. डेस्टिनेशन वेडिंग केल्यानंतर दोघे मुंबईत पार्टी देणार असल्याचे समजतेय. दोनही कुटुंबीयांमध्ये गिफ्ट एक्सचेंज करण्याचा रिवाजही सुरु झाला आहे. तर दीपिकानेही आपल्या लग्नाची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका तिची आई उजाला यांच्यासोबत एका ज्वेलरी शॉपमध्ये दिसली होती.

दीर्घकाळापासून दीपिका व रणवीर या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा होतेय. पण रणवीर किंवा दीपिका या दोघांनी कधीही अधिकृतपणे हे नाते मान्य केले नाही. मात्र दोघांची केमिस्ट्री सिनेमांतून आणि सोशल मीडियांच्या माध्यमातून नेहमीच दिसली. अनेक पार्टींंच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी दोघे हातात हात घालून एकत्र दिसतात. लग्नासाठी दीपिकाने सध्या कोणताच प्रोजेक्ट साईन केलं नसल्याचे समजतेय. लग्नात कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून नोव्हेंबरमधे आपल्या टीममधल्या सुट्टी न घेण्याची सक्त ताकीद दीपिकाने दिली आहे.

Web Title: Will Shahrukh Khan go to the wedding of Deepika Padukone and Ranveer Singh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.