करण जोहरच्या चित्रपट अनुष्का शर्मासोबत रोमांस करताना दिसणार विराट कोहली ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 05:58 AM2017-10-30T05:58:15+5:302017-10-30T11:28:33+5:30

सध्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहली जोडी वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे. दोघांच्या अफेअरच्या चर्चा बी-टाऊन असो किंवा क्रिकेटवर्ल्ड ...

Will Virat Kohli appear in romance with Karan Johar's film Anushka Sharma? | करण जोहरच्या चित्रपट अनुष्का शर्मासोबत रोमांस करताना दिसणार विराट कोहली ?

करण जोहरच्या चित्रपट अनुष्का शर्मासोबत रोमांस करताना दिसणार विराट कोहली ?

googlenewsNext
्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहली जोडी वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे. दोघांच्या अफेअरच्या चर्चा बी-टाऊन असो किंवा क्रिकेटवर्ल्ड दोन्ही ठिकाणी खुमासदारपणे रंगवल्या जातात. काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर दोघे एक कापड्या जाहिरातीत सुद्धा दिसले होते. सोशल मीडियावर हि जाहिरात खूपच हिट झाली होती. विराट आणि अनुष्काची केमिस्ट्री या जाहिरातीत सा-यांनीच पाहिली आहे. अवघ्या अर्ध्या तासात या जाहिरातीने युट्यूबवर अनेक लाइक्स आणि व्हियूज मिळवले होते. 

अनुष्का आणि विराटची ही जाहिरात पाहिल्यानंतर करण जोहरने सोशल मीडियावर अनुष्का आणि विराटची स्तुती केली होती. करण जोहरने ट्वीट सुद्धा केले होते. 
रिपोर्टनुसार करण जोहरला आपल्या एका चित्रपटात अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला कास्ट करायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपट विराट हिरो असेल आणि त्याच्या हिरोईनच्या भूमिकेत अनुष्का शर्मा दिसेल. जर ही बातमी खरी असेल तर त्यांच्या फॅन्सना हा चित्रपट म्हणजे एक ट्रीट असेल.  अनुष्का शर्मा आणि विराट कोहली डिसेंबरमध्ये लग्न करण्याची ही चर्चा आहे. दोघांनी ही डिसेंबरमध्ये आपआपल्या कामातून सुट्टी घेतली आहे. 

एका वेबसाइटनुसार अनुष्का आणि विराट या दोघांनीही लग्नाची संपूर्ण तयारी केली आहे. डिसेंबर २०१६ मध्येच दोघांचेही परिवार एकमेकांना भेटले होते. त्यानंतर या कपलने खासगीत साखरपुडा उरकला. आता दोघांच्या लग्नाच्या बातमीमुळे त्या साखरपुड्याच्या जुन्या गॉसिपला पुन्हा एकदा झळाळी मिळाली आहे. डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौºयावर जाणार आहे. या दौऱ्यात  तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि टी-२० सीरिज खेळली जाणार आहे. मात्र, या दौऱ्यातून विराटने बीसीसीआयकडे ब्रेक मागितल्याने त्याच्या लग्नाच्या बातमीला आणखीच बळकटी मिळत आहे. त्याने हा ब्रेक लग्नासाठीच मागितल्याची सध्या चर्चा रंगत आहे. श्रीलंका दौºयानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौºयावर जाणार आहे. त्यामुळे विराटकडे लग्नासाठी पुरेसा वेळ नसणार आहे. त्यामुळेच विराट आणि अनुष्का डिसेंबरमध्येच लग्न उरकण्याची तयारी करीत आहेत.  

ALSO RAED :  ​विराट कोहलीला अजिबात आवडत नाही, गर्लफ्रेन्ड अनुष्का शर्माची ‘ही’ सवय!

 

Web Title: Will Virat Kohli appear in romance with Karan Johar's film Anushka Sharma?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.