राजकारणात प्रवेश करणार का? उत्तर देताना कंगना राणौत म्हणाली - "पॉलिटिक्समध्ये समोर सगळे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:48 IST2023-10-11T14:47:28+5:302023-10-11T14:48:29+5:30
Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजकारणात पाऊल ठेवणार का, या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

राजकारणात प्रवेश करणार का? उत्तर देताना कंगना राणौत म्हणाली - "पॉलिटिक्समध्ये समोर सगळे..."
बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या तिचा आगामी चित्रपट तेजसमुळे चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे. चित्रपटाशिवाय अभिनेत्री बेधडक विधानांसाठी चर्चेत येत असते.
कंगना राणौत सोशल मीडियावर सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसते. काही दिवसांपूर्वी कंगनाने महिला आरक्षण विधेयकाचे समर्थन केले होते. सोबतच नवीन संसद भवनाचा दौरादेखील केला होता. बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री राजकारणात पाऊल टाकणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान आता एका मुलाखतीत कंगनाने राजकारणात प्रवेश करणार का, या प्रश्नावर उत्तर दिले आहे. तिने कित्येकदा इशाऱ्यात हिंट दिली. मात्र आता तिने कन्फर्म केले की जर काही चांगली ऑफर आली तर नाकारणार नाही. याशिवाय कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप कौतुक केले.
मी जेवढी प्रामाणिकपणे बोलते, तेवढा...
खरेतर कंगना राणौतने नुकतीच न्यूज १८च्या एका कार्यक्रमात गेली होती. तिथे कंगनाला राजकारणात प्रवेश करणार की नाही? या प्रश्नावर कंगना म्हणाली की, मी जेवढी प्रामाणिकपणे बोलते, तेवढा राजकारणात प्रामाणिकपणा चालत नाही. कोणीतरी मला खूप चांगले सांगितले आहे की सिनेइंडस्ट्रीत समोर सगळेच एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पण एकमेकांच्या पाठीमागे वाईट बोलतात. सगळे एकमेकांचे शत्रू आहेत. मात्र राजकारणात याउलट आहे. समोर सगळे शत्रू असतात आणि मागे सगळे मित्र असतात.
पुढे कंगना म्हणाली की, साऊथ इंडस्ट्रीमधून बरेच लोक राजकारणात आले आहेत आणि यशस्वीही झाले आहेत. मात्र नॉर्थमधील कोणत्या कलाकाराला इतके यश मिळाले नाही. बघू पुढे काय होते. जर मला कोणती चांगली संधी मिळाली तर नक्कीच मी त्याचा स्वीकार करेन.