आलिया भट्टशिवाय 'हा' चित्रपट होऊ शकला नसता- मेघना गुलजार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 05:38 AM2018-05-05T05:38:03+5:302018-05-05T11:08:03+5:30
मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी चित्रपट 'राजी'ची सध्या खूप चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. भारतासाठी हेरगिरी ...
म घना गुलजार दिग्दर्शित आगामी चित्रपट 'राजी'ची सध्या खूप चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. भारतासाठी हेरगिरी करणा-या तरूणीची भूमिका आलियाने यात साकारली आहे. मेघनाचा हा चित्रपट हरिंद सिक्का यांच्या 'कॉलिंग सहमत' या कादंबरीवर आधारित आहे.
चित्रपटाबाबत बोलताना मेघना गुलजार म्हणाली, ''चित्रपटातील मुख्य पात्र म्हणून माझी एकमात्र पसंत आलिया भट्ट होती. तिच्याशिवाय हा चित्रपट तयार झालाचं नसता. माझ्या मनात जेव्हापासून या चित्रपटाचा विचार आला होत्या तेव्हापासून डोक्यात फक्त आलियाचा चेहरा होता.'' पुढे ती म्हणाली, मी आलियाची आभारी आहे. तिच्याशिवाय मी हा चित्रपट तयार करुच शकले नसते. आलिया शिवाय या भूमिकेला कोणतीच अभिनेत्री न्याय देऊ शकली नसती.
आलिया यात सहमत नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारते आहे. सहमतचे वडील तिचे लग्न पाकिस्तानच्या एका अधिका-याची लावून देतात. तेथे राहून सहमतला भारतासाठी हेरगिरी करता येईल, एवढाच या लग्नाचा उद्देश असतो. आलियाचे अनेक रूप या चित्रपटात पाहायला मिळताहेत. एक आज्ञाधारी मुलगी, भारताची एक शूर कन्या , एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि एक नीडर गुप्तहेर अशा विविधांगी भूमिकेत ती दिसतेयं. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आलियाने चित्रपटात कुठेच मेकअप केलेला नाही. आलियाला ‘राजी’ चित्रपटासाठी असे अनेक कोड्स पाठ करावे लागलेत. केवळ इतकेच नाही तर यातील अॅक्शन सीन्ससाठीही आलियाने विशेष ट्रेनिंग घेतले, डायव्हिंग शिकले. आलियाला जीप चालवता येत नव्हती. पण या चित्रपटासाठी ती जीप चालवायला शिकली.
ALSO RAED : म्हणून 'राजी' सिनेमातल्या या सीनसाठी तब्बल 175 वेळा नेसावी लागली आलियाला साडी!
विक्की कौशल, सोनी राजदान, जयदीप अहलावत आणि रजित कपूर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘राजी’चे बहुतांश शूटींग काश्मीरात झाले आहे. येत्या ११ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणा-या या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार हिने केले आहे.