​मुलाखत घ्यायला गेलेल्या तरुणीवर रजनिकांत झाले होते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 11:38 AM2017-12-12T11:38:32+5:302017-12-12T17:08:32+5:30

रजनिकांत यांनी आज बॉलिवूड, दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. दक्षिणेत त्यांची अक्षरशः पूजा केली जाते. ...

The woman who had been interviewed had been rabbed due to Fiji | ​मुलाखत घ्यायला गेलेल्या तरुणीवर रजनिकांत झाले होते फिदा

​मुलाखत घ्यायला गेलेल्या तरुणीवर रजनिकांत झाले होते फिदा

googlenewsNext
निकांत यांनी आज बॉलिवूड, दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. दक्षिणेत त्यांची अक्षरशः पूजा केली जाते. रजनिकांत यांचे चित्रपट म्हटले की, ते हिटच होणार असे दाक्षिणात्य इंडस्ट्रीत म्हटले जाते. रजनिकांत यांनी चालबाज, अंधा कानून यांसारख्या हिंदी चित्रपटातदेखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. खूपच कमी जणांना माहीत आहे की, रजनिकांत यांची पत्नी लता रजनिकांत आणि त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. रजनिकांत आणि त्यांची पत्नी लता यांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे. 
लता रजनिकांत या कॉलेज मध्ये शिकत असताना कॉलेजच्या मासिकासाठी त्यांना रजनिकांत यांची मुलाखत घ्यायची होती. ही सत्तरीच्या दशकातील गोष्ट आहे. लता रजनिकांत यांना भेटायला गेल्या असता पहिल्या भेटीतच रजनिकांत त्यांच्यावर फिदा झाले. काहीच दिवसांत रजनिकांत आणि लता यांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली आणि त्यांनी २६ फेब्रुवारी १९८१ ला आंध्रप्रदेशमधील तिरूपती येथे लग्न केले. लता यांनी ऐंशीच्या दशकात अनेक तामीळ सिनेमांमध्ये गाणे गायले आहे. त्यांची अनेक गाणी गाजली आहेत. 

rajinikanth latha


शाळेपासूनच रजनिकांत यांना अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. रावणाची भूमिका साकारायला त्यांना फार आवडायचे. पुढे चित्रपटसृष्टीत आल्यावर एस. पी. मुथुरामन यांनी रजनिकांत यांना खलनायकाचे नायक बनवले. मुथुरामन यांच्या ‘Bhuvana Oru Kelvikkuri ’ या चित्रपटातील पहिल्या हाफमध्ये रजनी खलनायक म्हणून दिसले आणि नंतरच्या हाफमध्ये नायक म्हणून. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि सोबतच रजनी देखील हिट झाले. 
रजनीकांत यांनी तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटातसुद्धा काम केले आहे. या चित्रपटांनी त्यांना ग्लॅमर, प्रसिद्धी सगळे काही मिळवून दिले. पण एक क्षण असाही आला, जेव्हा हे सगळे सोडून निघून जावे, असे रजनिकांत यांना वाटत होते. त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णयही घेतला होते. पण के. बालचंदर, कमल हासनसारख्या त्यांच्या जवळच्या मित्रांनी त्यांना हा निर्णय घेण्यापासून परावृत्त केले. 

Also Read : रजनीकांत यांचे ‘हे’ वक्तव्य कोणालाही सुपरस्टार बनवेल, वाचा सविस्तर!

Web Title: The woman who had been interviewed had been rabbed due to Fiji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.