महिला सक्षमीकरण -बलात्काराचा ‘पिंक’शी संबंध नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2016 07:42 AM2016-09-03T07:42:52+5:302016-09-03T13:12:52+5:30

बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी खुप मोठा काळ गाजवला आहे. टीव्हीपासून ते बॉलीवूडच्या मोठमोठ्या चित्रपटांपर्यंत. या माध्यमातून ते घराघरापर्यंत ...

Women's empowerment - There is no relation with calling for calling 'Pink' | महिला सक्षमीकरण -बलात्काराचा ‘पिंक’शी संबंध नाही

महिला सक्षमीकरण -बलात्काराचा ‘पिंक’शी संबंध नाही

googlenewsNext
लीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी खुप मोठा काळ गाजवला आहे. टीव्हीपासून ते बॉलीवूडच्या मोठमोठ्या चित्रपटांपर्यंत. या माध्यमातून ते घराघरापर्यंत पोहोचले. त्यांच्या काळातील फार कमी कलाकार असतील जे आजही चर्चेत आहेत. त्यांचा आगामी ‘पिंक’ चित्रपट सध्या चर्चेत आहे.

त्यानिमित्त एका मुलाखतीत बोलतांना ते म्हणाले,‘मी म्हणजे काही कायदा नाही. किंवा मी सुरक्षा यंत्रणेत देखील नाही. मला फक्त एवढंच वाटतं की, आपण आपल्या मुलांना वाढवतो तेव्हा त्यांना मुलींचा आदर करण्याची सवय लावली पाहिजे. कुटुंब आणि समाज यांच्यासाठी मुली असणे गरजेचे असते. त्यांना केवळ कुणाच्या ‘वापरासाठी’ घडवण्यात येत नाही तर त्यांचेही वेगळे अस्तित्व असते याची जाणीव त्यांना करून देता आली पाहिजे.

त्यांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्त्वातून जावे लागते. मुली जेव्हा २०-२१ वर्षांच्या होतात तेव्हा त्यांना सांगितले जाते की, तुमचे नाव बदलून हे ठेवण्यात आले आहे. किंवा तुमचे आडनाव आता बदलले आहे. हे खरं आहे. आणि याचा त्यांच्यावर किती परिणाम होत असेल हे केवळ त्याच जाणू शकतात. ही प्रक्रिया म्हणजे केवळ मानसिक पातळीतील बदल आहे. ’

pink movie

 

Web Title: Women's empowerment - There is no relation with calling for calling 'Pink'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.