मंत्री स्मृती ईरानींनी दिला शब्द; ‘पद्मावती’च्या रिलीजमध्ये कुठलाही अडथळा येऊ देणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 01:34 PM2017-10-07T13:34:25+5:302017-10-07T19:04:45+5:30

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती ईरानी यांनी ‘पद्मावती’च्या टीमला शब्द दिला की, ‘पद्मावती’च्या रिलीजला राजस्थानमध्ये कुठलाही अडथळा येऊ देणार ...

The words given by Minister Smriti Irani; 'Padmavati' will not let any obstruction in the release! | मंत्री स्मृती ईरानींनी दिला शब्द; ‘पद्मावती’च्या रिलीजमध्ये कुठलाही अडथळा येऊ देणार नाही!

मंत्री स्मृती ईरानींनी दिला शब्द; ‘पद्मावती’च्या रिलीजमध्ये कुठलाही अडथळा येऊ देणार नाही!

googlenewsNext
ंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती ईरानी यांनी ‘पद्मावती’च्या टीमला शब्द दिला की, ‘पद्मावती’च्या रिलीजला राजस्थानमध्ये कुठलाही अडथळा येऊ देणार नाही. ‘पद्मावती’च्या रिलीजविषयी राजपूत करणी सेनेने चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याची धमकी दिली होती. भारतीय आर्थिक शिखर संमेलनात निर्माता करण जोहर याने स्मृती इराणी यांना, ‘पद्मावती’ लवकरच रिलीज होणार आहे. अशात राजस्थानातील विरोध पाहता ‘पद्मावती’च्या रिलीजला अडथळे येऊ शकतात, अशात एखादा असा मार्ग आहे का की, जेणेकरून चित्रपटाच्या रिलीजला अडथळा येणार नाही? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना स्मृती यांनी सांगितले की, ‘हे माझे दुर्भाग्य आहे की, मला संजय लीला भन्साळींसारख्या क्रिएटरबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही. मात्र मी तुम्हाला शब्द देते की, चित्रपट रिलीजप्रसंगी कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असेल. 


पुढे बोलताना स्मृती म्हणाल्या की, चित्रपट रिलीजदरम्यान जर कोणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई करण्याबाबत राज्य सरकार लक्ष ठेवून असेल. मला हेदेखील सांगायचे आहे की, आपल्याकडील मीडिया खूपच चौकस आहे. त्यामुळे निर्मात्यांनी एका गोष्टीमुळे अश्वास्त राहायला हवे की, आपल्या लोकशाहीतील सर्व स्तंभ जबाबदारीने काम करीत आहे. त्यामुळे ‘पद्मावती’च्या रिलीजमध्ये अडथळा निर्माण होईल, असा कुणीही परस्पर निकष लावू नये. 
 }}}} ">Had an engaging conversation with @karanjohar on changing dynamics of the entertainment industry. @wef#wefindiapic.twitter.com/rXppXRZAFZ— Smriti Z Irani (@smritiirani) October 6, 2017
संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ या चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला जात आहे. राजपूत करणी सेनेने शूटिंगदरम्यान सेटची तोडफोड केली होती. त्याचबरोबर राणी पद्मावतीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या पोस्टरची होळी केली होती. शिवाय हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. अशात स्मृती ईराणी यांनी दिलेला शब्द निर्मात्यांसाठी नक्कीच दिलासादायक म्हणावा लागेल. दरम्यान, चित्रपटात दीपिका व्यतिरिक्त शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: The words given by Minister Smriti Irani; 'Padmavati' will not let any obstruction in the release!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.