शाळेच्या फिससाठी ‘हा’ अभिनेता ढाब्यामध्ये करायचा भांडी धुण्याचे काम, वाचा त्याचा संघर्षपूर्ण प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 01:54 PM2018-05-19T13:54:16+5:302018-05-19T19:24:16+5:30

सायकलचे पंक्चर काढण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत तसेच किरणा दुकानात काम करण्यापासून ते गिरणी चालविण्याचे काम करणाºया या अभिनेत्याची कथा ...

The work of washing the utensil pots in the 'Dhanbaya', the struggle for the trip to school! | शाळेच्या फिससाठी ‘हा’ अभिनेता ढाब्यामध्ये करायचा भांडी धुण्याचे काम, वाचा त्याचा संघर्षपूर्ण प्रवास!

शाळेच्या फिससाठी ‘हा’ अभिनेता ढाब्यामध्ये करायचा भांडी धुण्याचे काम, वाचा त्याचा संघर्षपूर्ण प्रवास!

googlenewsNext
यकलचे पंक्चर काढण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत तसेच किरणा दुकानात काम करण्यापासून ते गिरणी चालविण्याचे काम करणाºया या अभिनेत्याची कथा जाणून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ‘लगान’ आणि ‘गंगाजल’सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाºया अभिनेता यशपाल शर्माच्या संघर्षाची कथा खूप काही सांगून जाते. अभिनयात नाव कमाविल्यानंतर यशपाल आता दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमाविणार आहे. त्याचा हा चित्रपट हरियाणाचा शेक्सपियर म्हणून ओळखल्या जाणाºया फोक आर्टिस्ट आणि कवी लखमीचंदच्या जीवनावर आधारित असणार आहे. यशपाल स्वत: हरियाणामधून आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना यशपालने करिअर, संघर्ष आणि यशाविषयी सांगितले. 

यशपालने सांगितले की, वयाच्या २२व्या वर्षी हरियाणातील हिसारमधून माझ्या राहत्या घरातून पळून जात दिल्ली गाठली होती. अभिनयाबद्दल इतकी ओढ होती की, जेव्हा वर्तमानपत्रात ‘अंधा युग’ या नाटकाची बातमी वाचली तेव्हा ते बघण्याचे मनोमन ठरविले. हे नाटक मला इतके आवडले होते की, चार महिने मी घरी परतलोच नाही. चार महिन्यांनंतर जेव्हा घरी परतलो तेव्हा लोकांनी, ‘कुठे गेला होतास?, काय करण्यासाठी गेला होतास? असे प्रश्न विचारले. त्यावर यशपालने संपूर्ण कथा सांगताना अभिनय क्षेत्रात जाण्याची इच्छा असल्याचे म्हटले. त्याची ही इच्छा ऐकून कोणीही आनंदी झाले नाही. कारण घरच्यांना वाटत होते की, अभिनय हे एक नाटक आहे. त्यात काही पैसा मिळत नाही. 



पुढे बोलताना यशपालने सांगितले की, दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर माझ्या आईचे निधन झाले. वडील फारशी काळजी घेत नसल्याने पुढील शिक्षणासाठी मी पार्टटाइम काम करण्यास सुरुवात केली. ढाब्यांमध्ये भांडी घासली, सायकलींचे पंक्चर काढले, गिरणीमध्ये काम केले तसेच किरणा दुकानात नोकरी केली. असाच संघर्ष करीत मी दिल्लीतील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामापर्यंत पोहोचलो. येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा मी गावाकडे परतलो. तेव्हा लोक विचारू लागले की, चित्रपटात केव्हा दिसणार? लोक चिडवत होते. विचारत होते की, जर तू चित्रपटांची ट्रेनिंग घेतली तर मग चित्रपटात का येत नाहीस? त्यांना सर्व काही खोटं वाटत होतं. त्यानंतर ३ सप्टेंबर १९९६ मध्ये मुंबईत आलो. 

तेथून यशपालचा चित्रपटांमधील प्रवास सुरू झाला. यशपालचा पहिला चित्रपट होता, ‘हजार चौरासी की मां...’ त्यानंतर त्याला ‘शूल’ हा चित्रपट मिळाला. पुढे ‘अर्जुन पंडित’ हा त्याचा तिसरा चित्रपट होता. यशपाल जेव्हा या चित्रपटांमध्ये काम मिळाले तेव्हा त्याने घरी फोन करून सांगितले की, सनी देओलसोबत चित्रपटाची शूटिंग करीत आहे. मात्र यावर कोणाचा विश्वासच बसला नाही. त्यांनी फक्त ‘काळजी घे’ ऐवढेच म्हटले. जेव्हा तो पडद्यावर बघावयास मिळाला तेव्हा त्याच्या घरच्यांना यावर विश्वास बसायला लागला. 



एकूणच अत्यंत संघर्ष करीत यशपालने बॉलिवूडमध्ये लौकिक मिळविला आहे. सध्या तो बॉलिवूडमध्ये स्थिर असून, आता अभिनयानंतर दिग्दर्शनात नशीब आजमाविणार आहे. 

Web Title: The work of washing the utensil pots in the 'Dhanbaya', the struggle for the trip to school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.