रात्रंदिवस काम करणं आलिया भटला पडलं महागात, दाखल करावं लागलं होतं रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 19:58 IST2021-01-18T19:57:38+5:302021-01-18T19:58:12+5:30
आलिया सध्या संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

रात्रंदिवस काम करणं आलिया भटला पडलं महागात, दाखल करावं लागलं होतं रुग्णालयात
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. कधी आगामी चित्रपटामुळे तर कधी रणबीर कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे. गेल्या काही दिवसापासून ती शूटिंगमध्ये व्यग्र आहे. पण सतत काम करणे तिला महागात पडले आहे. तिच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
आलिया भट सध्या संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच दरम्यान रविवारी आलियाची तब्येत बिघडली आणि तिला एन.एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अलिया दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून गंगूबाई काठियावाडीच्या शूटवर पोहचली.
'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात डॉन गंगूबाईची कथा दाखवण्यात आली आहे आणि चित्रपटात आलिया भट डॉनच्या भूमिकेत आहे. गंगूबाई साठच्या दशकात मुंबई माफियाचे नाव मोठे होते. असे सांगितले जाते की तिच्या नवऱ्याने तिला फक्त ५०० रुपयांसाठी विकले होते. त्यानंतर ती वेश्या व्यवसायात रुळली होती.
'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट स्त्री केंद्रीत आहे आणि या चित्रपटाची कहाणी आलिया भटच्या अवतीभवती फिरते. गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. चित्रपटात तो आलियाच्या गुरूची भूमिका साकारणार आहे.