‘टॉयलेट- एक प्रेमकथा’या सिनेमाचा या तारखेला होणार वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमिअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 10:05 AM2018-06-04T10:05:39+5:302018-06-04T15:35:39+5:30

घरात शौचालय बांधले नाही,तर आपण घर सोडून निघून जाऊ अशी धमकी एक नववधू आपल्या पतीला देते.पत्नीचे प्रेम आणि आत्मसन्मान ...

World Television Premiere will be on this date of 'Toilet - A Love Story'! | ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’या सिनेमाचा या तारखेला होणार वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमिअर!

‘टॉयलेट- एक प्रेमकथा’या सिनेमाचा या तारखेला होणार वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमिअर!

googlenewsNext
ात शौचालय बांधले नाही,तर आपण घर सोडून निघून जाऊ अशी धमकी एक नववधू आपल्या पतीला देते.पत्नीचे प्रेम आणि आत्मसन्मान प्राप्त करण्यासाठी पती प्रतिगामी विचारांच्या समाजाशी लढा देतो.‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता अक्षयकुमार प्रमुख भूमिकेत असून एक प्रेमी दाम्पत्य पारंपरिक भारतीय समाजाच्या प्रतिगामी विचारसरणीत बदल करण्यासाठी एकमेकांपासून विभक्त होतात, अशी कथा सादर करण्यात आली आहे.पण समाजाला गर्तेतून वर आणण्याचाच विचार त्यांच्या या संघर्षामागे आहे.अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा संपूर्ण कौटुंबिक मनोरंजनपट शनिवार, 9 जून रोजी रात्री 8.00 वाजता ‘ब्लॉकबस्टर चित्रपटांचे चॅनल’ असलेल्या ‘झी सिनेमा’ या वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.या चित्रपटाने समीक्षकांची प्रशंसा जशी मिळविली, तसेच व्यावसायिक यशही मिळविले. विनोद, प्रणय आणि संघर्ष यांचे चित्रपटाच्या कथेत सुयोग्य मिश्रण झाले आहे. चित्रपटात अनुपम खेर, सुधीर पांडे आणि दिव्येंदू शर्मा यासारखे दिग्गज कलाकार आहेत.तिरकस शेरेबाजी आणि दमदार संवादांतून दिग्दर्शक श्रीनारायण सिंह यांनी समाजातील दोन पिढ्यांतील संघर्षावर प्रकाश टाकला आहे. मुलगा आपल्या वडिलांना बदलत्या काळातील नव्या मूल्यांचे महत्त्व पटवून देतो, हे त्यांनी नेमकेपणाने दाखविले आहे.

आपला धाकटा भाऊ नारू याला आपल्या वडिलांचे सायकल दुरुस्तीचे दुकान चालविण्यास 36 वर्षांचा केशव मदत करत असे. केशव अजूनही अविवाहित असतो, याचे कारण त्याच्या वडिलांची अंधश्रध्दा. ज्या मुलीच्या एका हाताला दोन अंगठे असतील, त्याच मुलीशी केशवचे लग्न होऊ शकते, अशी त्यांची समजूत असते. तशात केशवची गाठ जया या सुखवस्तू आणि उच्चशिक्षित मुलीशी पडते आणि बऱ्याच प्रयत्नांती तो तिचे मन जिंकतो.पण लग्नानंतरच्या पहिल्याच दिवशी- म्हणजे पहाटेच संघर्षाला प्रारंभ होतो. कारण केशवच्या घरात शौचालयच नसते,हे तिला समजते आणि ती घर सोडून निघून जाते. तिच्या जाण्यामुळे निराश आणि उद्विग्न झालेला केशव तिला परत आणण्यासाठी समाजाच्या बुरसटलेल्या,मागास मानसिकतेविरोधात आणि पारंपरिक समजुतींविरोधात संघर्ष पुकारतो.घरात शौचालय बनविण्याची केशवची योजना तडीस जाते का? आपल्या कुटुंबातच निर्माण झालेल्या दोन पिढ्यांतील
संघर्षाला संपविण्यात तो यशस्वी होतो का?या सगळ्या गोष्टीं पुन्हा अनुभवता येणार आहे.

Web Title: World Television Premiere will be on this date of 'Toilet - A Love Story'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.