NCB अधिकाऱ्याची भूमिका साकारायला आवडेल, अक्कीला उत्सुकता ऑफरची
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 04:01 PM2021-11-13T16:01:20+5:302021-11-13T16:03:14+5:30
अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Sooryavanshi Box Office Collection) धुमाकूळ घालतोय. 5 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या.
मुंबई - आर्यन खान क्रुझ ड्रग्ज प्रकरणामुळे सध्या एनसीबी आणि एनसीबी अधिकारी चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच, एनसीबीच्या मुंबई झोनचे डायरेक्टर समीर वानखेडे हे मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपामुळे सध्या देशभरात चर्चिले जाणार अधिकारी आहेत. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आरोप केल्यानंतर, अनेकांनी समीर वानखेडे यांना सिंघम अधिकारी असंही म्हटलंय. तर, ड्रग्ज प्रकरण आणि समीर वानखेडे यांच्यावर चित्रपट बनविण्याचंही काहींनी सूचवलंय. आता, बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने यासंदर्भात मत व्यक्त केलंय.
अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Sooryavanshi Box Office Collection) धुमाकूळ घालतोय. 5 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. परिणामी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. केवळ पाच दिवसांत ‘सूर्यवंशी’ने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. बुधवारी 6 व्या दिवशीही चित्रपटाने चांगली कमाई केली. त्यामुळे, बॉलिवूडचा खिलाडी आणि चाहत्यांचा अक्की चांगलाच खुश आहे. अक्षयची बॉक्स ऑफिसरवरही जोरदार दिवाळी दिसत आहे.
चित्रपटाला मिळालेल्या यशाने अक्षय समाधानी आहे. त्यासंदर्भात बोलताना अक्षयने कोरोना कालवधीनंतरचे बदल, कोरोना काळ आणि बदलेलं डिजिटल माध्यमा यांबाबतही सविस्तर मत मांडलं. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेनंतर आता एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार का? असा प्रश्न अक्षयला विचारण्यात आला होता. त्यावर, मला तशी ऑफर आल्यास एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका साकायरला निश्चितच आवडेल, असेही अक्षयने म्हटले.