'घायल वन्स मोअर'ला लागली २५ वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:14 AM2016-01-16T01:14:10+5:302016-02-07T11:08:42+5:30

स नी देओलने त्याच्या करीअरमध्ये अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. १९९0 मध्ये गाजलेल्या त्याच्या 'घायल'चा तो सध्या सिक्वेल बनवत ...

'Wounded Ones' took over 25 years | 'घायल वन्स मोअर'ला लागली २५ वर्षे

'घायल वन्स मोअर'ला लागली २५ वर्षे

googlenewsNext
नी देओलने त्याच्या करीअरमध्ये अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. १९९0 मध्ये गाजलेल्या त्याच्या 'घायल'चा तो सध्या सिक्वेल बनवत आहे. 'अर्जुन' आणि 'दामिनी' या चित्रपटांचेही सिक्वेल बनवण्याचे सध्या त्याच्या मनात आहे. याबाबत बोलताना सनी म्हणाला, 'काही हीट चित्रपटांचे सिक्वेल बनवायचे माझ्या मनात असले तरीही चित्रपटाची कथा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जोपर्यंत या चित्रपटांच्या कथेला कसे पुढे न्यायचे हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत मी सिक्वेलचा विचारही करू शकत नाही. 'घायल'च्या सिक्वेलची कथा निश्‍चित होण्यासाठी मला तब्बल २५ वष्रे लागली.' आता एका चित्रपटाची कथा निश्‍चित करण्यासाठी सनी २५ वष्रे घेत असेल. तर त्याच्या बाकीच्या चित्रपटांचे सिक्वेल येण्यासाठी चाहत्यांना खूप लंबा इंतजार करावा लागणार असे दिसते.

Web Title: 'Wounded Ones' took over 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.