'सूर्यवंशी'च्या सेटवर मराठी अभिनेत्रीला मिळाली अशी वागणूक; स्वत:च केला खुलासा

By शर्वरी जोशी | Published: December 6, 2021 06:30 PM2021-12-06T18:30:00+5:302021-12-06T18:30:00+5:30

sooryavanshi: या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेल्या या चित्रपटातील एक मराठमोळी अभिनेत्री अनेकांचं लक्ष वेधत आहे.

ya sukhano ya fame marathi actress sharvari lohokare share her experience about sooryavanshi movie | 'सूर्यवंशी'च्या सेटवर मराठी अभिनेत्रीला मिळाली अशी वागणूक; स्वत:च केला खुलासा

'सूर्यवंशी'च्या सेटवर मराठी अभिनेत्रीला मिळाली अशी वागणूक; स्वत:च केला खुलासा

googlenewsNext

बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ठरलेला 'सूर्यवंशी' (sooryavanshi) हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अक्षय कुमार (akshay kumar) ,कतरिना कैफ (katrina kaif), अजय देवगण (ajay devgn) आणि रणवीर सिंग (ranveer singh) अशी तगडी स्टारकास्ट झळकली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसव बक्कळ कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेल्या या चित्रपटातील एक मराठमोळी अभिनेत्री अनेकांचं लक्ष वेधत आहे. या चित्रपटात या अभिनेत्रीने जरी लहानशी भूमिका केली असली तरीदेखील तिच्या अभिनयावर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्येच मात्र, तिने सूर्यवंशीच्या सेटवर तिला कशा प्रकराची वागणूक मिळाली हे 'लोकमत ऑनलाइन'च्या मुलाखतीत सांगितलं आहे.

२०२१ मध्ये सुपरहिट ठरत असलेल्या सूर्यवंशी या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री शर्वरी लोहकरे हिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या सुखांनो या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या शर्वरीचा सूर्यवंशी हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाने तिला बरंच काही दिल्याचं तिने म्हटलं आहे. विशेष म्हणजे या सेटवरील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्याकडून मिळालेली वागणूक वाखाणण्याजोगी होती असंही तिने सांगितलं. थोडक्यात 'सूर्यवंशी'च्या सेटवर घरच्याप्रमाणे वातावरण होतं हे तिने आवर्जुन सांगितलं. 

"मला वाटतंय माझ्या एवढं लकी कोणीच नसेल. कारण, इतका मोठा चित्रपट आणि इतकी सुंदर टीम मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. या चित्रपटातील केवळ कलाकाराच नाही तर दिग्दर्शक सुद्धा खूप चांगले मिळाले. कारण, ज्यावेळी तुम्ही सेकंडरी कॅरेक्टर करत असता त्यावेळी तुमच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. मात्र, सूर्यवंशीच्या सेटवर फार वेगळं वातावरण होतं. प्रत्येक कलाकाराला समान वागणूक देण्यात आली.येथे कोणीच मोठा किंवा लहान कलाकार नव्हता. सगळे समसमान होते, "असं शर्वरी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "रोहित शेट्टी एक उत्तम दिग्दर्शक आहे. ते अगदी स्पॉटबॉयपासून ते निर्मात्यांपर्यंत सगळे त्यांच्यासाठी समान आहेत. आणि हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कतरिना आणि अक्षय हे दोन्ही मोठे कलाकार आहेत. पण, त्यांच्या इतकं नम्र आणि चांगले सहकलाकार कोणीच नाहीत. त्यांच्यासोबत काम करतांना घरचा फिल होता. म्हणजे मराठी कलाकारांसोबतच आपण काम करतोय असं वाटायचं. कुठल्याही प्रकारचा स्टारडम त्यांनी दाखवला नाही. अनेकदा मला रोहित शेट्टींसोबत थेट बोलणं जमायचं नाही तर अशावेळी अक्षय कुमारने स्वत: माझ्यासाठी रोहित शेट्टीला बोलावलं. त्यामुळे या सगळ्यांचं वावर इतका सहज होता की काम करतांना मनावर कोणतंच दडपण नव्हतं."

दरम्यान, चित्रपटाच्या सेटवर अक्षय, कतरिना आणि रोहित शेट्टी यांनी खूप घरच्यासारखं फिलिंग दिलं. त्यांच्या वागण्यातून ते खूप मोठे स्टार्स आहेत असं कधीच दाखवलं नाही, असं म्हणत शर्वरीने सूर्यवंशीच्या टीमचं कौतुक केलं. या चित्रपटात तिने एका एटीएस ऑफिसरच्या पत्नीची भूमिका साकारली होती. वंदना तांबे असं तिच्या भूमिकेचं नाव होतं.
 

Web Title: ya sukhano ya fame marathi actress sharvari lohokare share her experience about sooryavanshi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.