"मला निघून जायचं होतं, बस्स...", यामी गौतम बॉलीवूडच्या बिघडलेल्या सिस्टमनं वैतागलेली; सारं सोडणार होती!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 08:36 PM2023-01-01T20:36:49+5:302023-01-01T20:37:25+5:30

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम हिनं मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

yami gautam reveals wanted to quit film industry talks about career lows unfair treatment | "मला निघून जायचं होतं, बस्स...", यामी गौतम बॉलीवूडच्या बिघडलेल्या सिस्टमनं वैतागलेली; सारं सोडणार होती!

"मला निघून जायचं होतं, बस्स...", यामी गौतम बॉलीवूडच्या बिघडलेल्या सिस्टमनं वैतागलेली; सारं सोडणार होती!

googlenewsNext

नवी दिल्ली-

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम हिनं मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेत झगमगाटापासून दूर राहात फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर यश प्राप्त केलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून यामी गौतम ओळखली जाते. तिनं नुकतंच एका मुलाखतीत यामीनं एक मोठा खुलासा केला. तिच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की जेव्हा तिला ही इंडस्ट्री सोडून द्यायची होती. इथं फक्त दिसण्याला महत्व दिलं जातं असं यामीला वाटू लागलं होतं. 

यामीनं फिल्म इंडस्ट्रीमधील सिस्टमवर भाष्य केलं आणि सांगितलं की एक वेळ अशी येते की जेव्हा तुमच्या मनाला एखादी गोष्ट खूप वाईट वाटते. माझा संताप कोणत्याही एका व्यक्तीबाबत नाहीय, मी फक्त माझ्या मनातली गोष्ट शेअर करत आहे. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात असं फिलिंग मला वाटतं प्रत्येक कलाकाराला येत असतं. मला कोणतीही आघाडी किंवा उठाव करायचा नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येत असतो जिथं तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागतो, असं यामी म्हणाली. 

"जसे पुरस्कार सोहळे असतात त्याच पद्धतीनं हेही सुरू असतं. पण एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून तुम्ही विचार करत असता की त्या मुलाखतीत, स्टेजवर आपणही हवे होतो. पण तुम्हाला निमंत्रितच करण्यात आलेलं नाही. आता मला निमंत्रित केलंही जातं. पण मी हे त्यावेळची गोष्ट सांगत आहे जेव्हा माझ्या करिअरच्या सुरुवातीचा काळ होता. चित्रपटात तुम्ही मुख्य भूमिकेत असता पण तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावलं जात नाही. कारण तुम्ही प्रसिद्ध चेहरा नसता", असं यामी दिलखुलासपणे बोलली. 

क्षमतेपेक्षा जास्त पीआर करू शकत नाही
यामी म्हणाली कधी कधी हिट्सच्या यादीतही आपलं नाव असणं टोचत राहतं. "आता मी एक सुरक्षित व्यक्ती आहे. पण एक वेळ अशी होती की मला अनेक गोष्टींचा त्रास व्हायचा. कारण तुमच्या अवतीभोवती असं वातावरण तयार केलं जातं की तुम्ही एक स्टार आहात. पापराजी येतात तुमचे फोटो टिपतात, चाहत्यांची गर्दी तुमचा पाठलाग करते, तुमची मोठी पीआर टीम असते. पण मी अशी नाही. मला एक गोष्ट लक्षात आली आहे की याचा चाहत्यांना कोणताच फरक पडत नाही. त्यांना फक्त एक चांगला सिनेमा हवा असतो", असं यामी म्हणाली. 

अनेक निर्माते असे आहेत की मला पीआरकडे जास्त लक्ष केंद्रीत कर असा सल्ला देतात. पण मी तसं करू शकत नाही. कोणतीही गोष्ट आवश्यकतेनुसार करावी असं मला वाटतं. तुम्ही एखादी गोष्ट करू लागता आणि ती तुमच्या आयुष्याचा केव्हा भाग होऊन बसते याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. मला फक्त चांगलं काम करायचं आहे. 'बाला' सिनेमासाठी नामांकन न मिळाल्यानं मला वाईट वाटलं होतं. त्यावेळी मी ठरवलं होतं की आता कोणताही सिनेमा करणार नाही, असा खुलासा यामी गौतम हिनं केला. 

इंडस्ट्री सोडावीशी वाटली होती
"बाला सिनेमा करण्यापूर्वी इंडस्ट्रीतून बाहेर पडणार होते. चांगलं काम करुनही जशी ओळख प्राप्त व्हायला हवी होती तशी झाली नाही. मला हे सारं सोडून द्यायचं होतं. मला अभिनयात खूप रस आहे, पण याचा अर्थ तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही असा होत नाही. मी ठरवलंही होतं आणि आईनंही मला हवं ते करण्याची मुभा दिली होती. ज्यात तुला सुखाची झोप येईल असं काम कर असं आईनं सांगितलं होतं. कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नको. मेहनत कर पण प्रत्येक गोष्टीचा निकाल चांगलाच लागला पाहिजे असं काही बंधनकारक नाही", असं यामीनं सांगितलं. 

Web Title: yami gautam reveals wanted to quit film industry talks about career lows unfair treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.