चेहरा लपवत लखनऊच्या रस्त्यावर फिरत होती ही अभिनेत्री? पण तिला कोणी ओळखलंच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 17:34 IST2019-07-03T17:30:30+5:302019-07-03T17:34:04+5:30
तिने अगदी कमी मेकअप केला होता त्यामुळे अगदी सामान्य मुलींप्रमाणे ती दिसत होती. त्यामुळे तिला कोणीही ओळखु शकले नाही. या गोष्टीचा तिला आनंदच असल्याचे तिने सांगितले.

चेहरा लपवत लखनऊच्या रस्त्यावर फिरत होती ही अभिनेत्री? पण तिला कोणी ओळखलंच नाही
कामाच्या निमित्ताने कधीच निवांत असा वेळ मिळत नाही त्यामुळे वेगवेगळ्या शहरामध्ये शूटिंग होत असताना तेथील काही स्थळांना भेट देणे होतच नाही. मात्र यावेळी लखनऊ या शहराविषयी जाणून घेण्याची उत्सुकता यामीला होती. मात्र सेलिब्रेटी असल्यामुळे तिला एकटीला फिरणेही अशक्यच. मात्र यामी गौतमीने एक वेगळीच शक्कल लढवली. लखनऊमध्ये शूटिंगच्या बिझी शेड्युअलमधून वेळ काढून तिने फेरफटका मारण्याचे ठरवले. लखनऊच्या रस्त्यांवर यामी गौतमी फिरत होती. मात्र या रुपात यामीला क्षणभर कुणीच ओळखू शकलं नाही.
हा अनुभव खरंच खूप मजेशीर असल्याचे तिने तिच्या चाहत्यांना फोटो शेअर करत सांगितले. विशेष म्हणजे यावेळी यामीबरोबर कोणात्याही प्रकारची सिक्योरिटी नव्हती. या सगळ्या गोष्टी बाजुला ठेवत तिने विविध स्थळांना भेट देत मस्त मनमुराद आनंद लुटला. यावेळी तिने अगदी कमी मेकअप केला होता त्यामुळे अगदी सामान्य मुलींप्रमाणे ती दिसत होती. त्यामुळे तिला कोणीही ओळखु शकले नाही. या गोष्टीचा तिला आनंदच असल्याचे यामीने सांगितले.
सध्या यामी 'बाला' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.या सिनेमात ती एका मॉडेलची भूमिका साकारणार आहे. अभिनय कारकिर्दीला सुरूवात तिने मॉडेलिंगपासूनच केली होती. त्यामुळे सिनेमात ही भूमिका साकारण्यासाठी तिच्या मॉडेलिंग क्षेत्राचा खूप फायदा झाल्याचे तिने म्हटले आहे.
यामीसह सिनेमात आयुष्मान खुराना आणि भूमि पेडनेकरही झळकणार आहे. यामीने आयुष्यमान खुरानासह 'विक्की डोनर' सिनेमातून बॉलिवूड डेब्यु केला होता. ऋतिक रोशनसह 'काबिल' सिनेमातही ती झळकली तिच्या भूमिकेलाही रसिकांनी अधिक पसंती दिली होती.