यामी गौतमवर का आली मुंबई हायकोर्टात जाण्याची वेळ, वाचा सविस्तर !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 07:15 AM2018-05-31T07:15:36+5:302018-05-31T12:45:36+5:30

शाहिद कपूरसोबत 'बत्ती गुल मीटर चालू'मध्ये दिसणारी यामी गौतम सध्या मुंबई हायकोर्टाच्या चक्कर काढताना दिसतेय. यात घाबरुन जाण्यासारखे काहीच ...

Yami Gautam's time to go to Mumbai High Court, read detailed! | यामी गौतमवर का आली मुंबई हायकोर्टात जाण्याची वेळ, वाचा सविस्तर !

यामी गौतमवर का आली मुंबई हायकोर्टात जाण्याची वेळ, वाचा सविस्तर !

googlenewsNext
हिद कपूरसोबत 'बत्ती गुल मीटर चालू'मध्ये दिसणारी यामी गौतम सध्या मुंबई हायकोर्टाच्या चक्कर काढताना दिसतेय. यात घाबरुन जाण्यासारखे काहीच नाही कारण यामी कोणत्या केसच्या संदर्भात कोर्टात आलेली नाही तर तिचा आगामी चित्रपटासाठी याठिकाणी आली आहे.



यामी 'बत्ती गुल मीटर चालू'मध्ये मध्ये वकिलाची भूमिका साकारते आहे. या भूमिकेच्या तयारीसाठी ती कोर्टात आली होती.   यासाठी ती हिंदी साहित्यचा अभ्यास करते आहे. यामीने एका इंटरव्हु दरम्यान सांगितले होते की, ''पडद्यावर माझी भूमिका खूप मोठी नाही आहे मात्र यासाठी जी तयारी मी करते आहे ती जास्त इंटरेस्टिंग आहे. सध्या मी भाषेवर काम करते आहे आणि त्यासाठी मी हिंदी साहित्याची मदत घेते आहे.'' श्री नारायण सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करित आहे. या आधी त्यांनी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ सारखा सामाजिक विषयावर चित्रपट तयार केला आहे. यात शाहिद शिवाय यामी गौतम आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट वीज चोरीवर आधारित आहे. वीज कंपनीच्या पायºया झिजवणाऱ्या सामान्य माणसाची कथा यात दिसणार असल्याचे कळते.  श्रद्धा यात एका खास पद्धतीच्या एक्सेंटमध्ये बोलताना दिसणार आहे. तर यात शाहिद एका वकिलाची भूमिकेत दिसणार आहे जो वीज कंपनीच्या विरोधात लढत असतो. या भूमितेसाठी शाहिद गढवाली भाषा शिकतो आहे. या चित्रपटाचे अधिकतर शूटिंग उत्तराखंडमध्ये झाले आहे. 31 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

यामी शेवटची 2017मध्ये आलेल्या काबिल या चित्रपटात अखेरची दिसली होती. यात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत ऋतिक रोशन होता. यामीने यात साकारलेल्या अंध मुलीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.  

Web Title: Yami Gautam's time to go to Mumbai High Court, read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.