‘रफ्ता रफ्ता’आणि बरेच काही! ‘यमला पगला दिवाना फिर से’चा ट्रेलर पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 06:01 PM2018-08-10T18:01:33+5:302018-08-10T18:02:24+5:30

‘यमला पगला दिवाना फिर से’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. देओल पितापुत्र म्हणजे धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल यांची जुगलबंदी या चित्रपटाची जमेची बाजू आहे.

yamla pagla deewana phirse movie trailer out | ‘रफ्ता रफ्ता’आणि बरेच काही! ‘यमला पगला दिवाना फिर से’चा ट्रेलर पाहाच!!

‘रफ्ता रफ्ता’आणि बरेच काही! ‘यमला पगला दिवाना फिर से’चा ट्रेलर पाहाच!!

googlenewsNext

‘यमला पगला दिवाना फिर से’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. देओल पितापुत्र म्हणजे धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल यांची जुगलबंदी या चित्रपटाची जमेची बाजू आहे. ट्रेलरमध्येही हे स्पष्टपणे दिसतेय. या ट्रेलरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यातील ‘रफ्ता रफ्ता’ या गाण्याची झलक. धर्मेन्द आणि रेखा यांच्यावर चित्रित हे एकेकाळचे सुपरहिट गाणे या चित्रपटात रिक्रिऐट करण्यात आले आहे. ट्रेलरच्या शेवटी याची एक हलकीशी झलक पाहायला मिळते. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांचा या गाण्यातील जलवा पाहण्यासारखा आहे. कॉमेडीसोबतच सनी देओलच्या जबरदस्त अ‍ॅक्शनचा तडकाही देण्यात आला आहे.

'यमला पगला दिवाना फिर से' हा संपूर्ण कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा असल्याचे बोलले जात आहे. मागील दोन भागांप्रमाणेच बॉबी देओल आणि सनी देओल भाऊ म्हणूनच या सिनेमातही व्यक्तिरेखा साकारतील. क्रिती खरबंदा चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर धर्मेंद्र यांची भूमिका प्रेक्षकांसाठी सरप्राईज असून या नवीन भागात ते वकिलाच्या भूमिकेत दिसतील.
'यमला पगला दीवाना फिर से' चित्रपट आधी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण, त्याच दिवशी अक्षय कुमारचा गोल्ड व जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते' देखील प्रदर्शित होणार होता. बॉक्स ऑफिसवरील क्लॅशपासून बचाव करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. 'यमला पगला दिवाना फिर से' हा चित्रपट ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: yamla pagla deewana phirse movie trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.