Yash Chopra birthday : यश चोप्रा यांना अजिबात आवडायचा नाही शाहरूख खान; नंतर त्यालाच बनवले सुपरस्टार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 09:16 AM2018-09-27T09:16:42+5:302018-09-27T09:17:26+5:30

यश चोप्रा यांना रोमान्सचा किंग म्हटले जाते. इत्तेफाक, दाग, लम्हे, चांदनी, दिल तो पागल है, वीरलारा असे अनेक चित्रपट त्यांनी दिले. १९३२ साली आजच्याच दिवशी म्हणजे २७ सप्टेंबरला यश चोप्रा यांचा जन्म झाला होता. 

Yash Chopra birthday: romance king director yash chopra birthday he did not like shahrukh KHAN | Yash Chopra birthday : यश चोप्रा यांना अजिबात आवडायचा नाही शाहरूख खान; नंतर त्यालाच बनवले सुपरस्टार!!

Yash Chopra birthday : यश चोप्रा यांना अजिबात आवडायचा नाही शाहरूख खान; नंतर त्यालाच बनवले सुपरस्टार!!

googlenewsNext

यश चोप्रा आज आपल्यात नाहीत. पण यश चोप्रांचे सिनेमे मात्र कुठलाच बॉलिवूडप्रेमी विसरू शकत नाही. यश चोप्रा यांना रोमान्सचा किंग म्हटले जाते. इत्तेफाक, दाग, लम्हे, चांदनी, दिल तो पागल है, वीरलारा असे अनेक चित्रपट त्यांनी दिले. १९३२ साली आजच्याच दिवशी म्हणजे २७ सप्टेंबरला यश चोप्रा यांचा जन्म झाला होता. चारदा फिल्मफेअर बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार पटकावणारे यश चोप्रा आणि शाहरूख खान या जोडीने दीर्घकाळ बॉलिवूड गाजवले. कदाचित यश चोप्रा नसते तर शाहरूख आज इतका मोठा स्टार नसता. यश चोप्रा दिग्दर्शित डर, दिल तो पागल है, दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे, मोहब्बतें, वीर जारा, रब ने बना दी जोडी, जब तक है जान यासारख्या चित्रपटांत शाहरूखने काम केले. शाहरूख हा यश चोप्रांचा आवडता अभिनेता होता. पण एकेकाळी हाच शाहरूख यश चोप्रा यांना जराही आवडायचा नाही.

होय, डर चित्रपटासाठी त्यांनी शाहरूखला सार्ईन तर केले. पण त्यावेळी शाहरूख त्यांना अजिबात आवडत नसे. यश चोप्रांनी शाहरूखच्या किंग अंकल या चित्रपटाचे काही फुटेज पाहिले होते, जे त्यांना आवडले नव्हते. पण शाहरूखला साईन करणे त्यांची एकप्रकारे ‘मजबुरी’ होती. कारण अन्य कुठलाच अभिनेता हा निगेटीव्ह रोल करायला तयार नव्हता. डर या चित्रपटात यश चोप्रा व शाहरूख यांनी प्रथम काम केले. पण या पहिल्याच चित्रपटातील शाहरूखचे काम पाहून यश चोप्रा कमालीचे प्रभावित झालेत. पुढे तर त्यांची चांगली गट्टीचं जमली. 


यश चोप्रा यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. पण या घोषणेनंतर ते महिनाभरही कुटुंबासोबत शांत बसू शकले नाही. ‘जब तक है जान’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पुन्हा वापसी केली. त्यांच्या याही चित्रपटात शाहरूख खानचीच वर्णी लागली.  त्यापूर्वी त्यांनी दिग्दर्शित केलेला २००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वीरजारा’ त्यांचा शेवटचा चित्रपट होता. यातही शाहरूख खान हाच लीड रोलमध्ये होता.
एका मुलाखतीत यश चोप्रा यांनी त्यांच्या पहिल्या ब्रेकबद्दल सांगितले होते. १९५८ मध्ये मोठा भाऊ बी आर चोप्रा यांच्यासोबत साधना या चित्रपटात काम करत असताना त्यांची मुलाखत वैजयंतीमालासोबत झाली. वैजयंतीमाला यांनीच यश चोप्रा यांना दिग्दर्शनावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला होता.

Web Title: Yash Chopra birthday: romance king director yash chopra birthday he did not like shahrukh KHAN

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.