‘केजीएफ 2’ आमच्यासाठी फक्त सिनेमा नाही...! क्रेजी फॅनने पीएम मोदींकडे केली अजब मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 01:43 PM2021-02-02T13:43:48+5:302021-02-02T13:47:46+5:30

मोदी यांना पत्र, काय आहे लिहिलंय या पत्रात?

yash fan pen letter to pm narendra modi to declare national holiday on the kgf chapter 2 release 16 july 2021 | ‘केजीएफ 2’ आमच्यासाठी फक्त सिनेमा नाही...! क्रेजी फॅनने पीएम मोदींकडे केली अजब मागणी  

‘केजीएफ 2’ आमच्यासाठी फक्त सिनेमा नाही...! क्रेजी फॅनने पीएम मोदींकडे केली अजब मागणी  

googlenewsNext
ठळक मुद्दे‘केजीएफ- चॅप्टर 1’ या सिनेमाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा तुफान गाजला होता.

साऊथचा सुपरस्टार यश याचा बहुप्रतिक्षीत ‘केजीएफ- चॅप्टर 2’ हा सिनेमा कधी एकदा रिलीज होतो, असे चाहत्यांना झालेय. ‘केजीएफ 2’ हा चाहत्यांसाठी सिनेमा नाही तर एक इमोशन आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, 16 जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि अशात चाहते कामाला लागले आहेत. होय, ‘केजीएफ 2’च्या रिलीजच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी एका क्रेजी चाहत्याने केली आहे. यासाठी त्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे.

 पीएम मोदी यांना पत्र लिहून या चाहत्याने येत्या 16 जुलैला नॅशनल हॉलीडे घोषित करण्याची विनंती केली आहे. या चाहत्याचे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.

‘माननीय सर, आपणा सर्वांनाच ठाऊक आहे की, यशचा ‘केजीएफ 2’ हा सिनेमा शुक्रवारी 16 जुलै 2021 रोजी प्रदर्शित होतोय. चाहते आतुरतेने या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. अशात आम्ही विनंती करतो की,  16 जुलैला राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी. आमच्यासाठी हा सिनेमा नाही तर भावना आहे. आमच्या भावना तुम्ही समजूल घ्याल ही विनंती, ’ असे या पत्रात म्हटले आहे.
तुम्हाला आठवत असेलच की, ‘केजीएफ 2’चा टीजर रिलीज झाला त्यावेळी चाहते अक्षरश: वेडे झाले होते.

‘केजीएफ- चॅप्टर 1’ या सिनेमाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा तुफान गाजला होता. ‘केजीएफ 2’ याचाच सीक्वल आहे. ‘केजीएफ -1’  ज्या ठिकाणी संपला, तेथूनच पुढे ‘केजीएफ 2’ची कथा सुरु होत आहे. या सिक्वलमध्ये यशशिवाय संजय दत्त आणि रवीना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  

Web Title: yash fan pen letter to pm narendra modi to declare national holiday on the kgf chapter 2 release 16 july 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.