KGF 2 : रॉकीभाईच्या आईची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री रिअल लाईफमध्ये आहे भलतीच ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 18:20 IST2022-03-09T18:17:09+5:302022-03-09T18:20:41+5:30
KGF 1 : रॉकीच्या आईची भूमिका छोटी होती पण प्रभावी होती. ही भूमिका साकारली होती अर्चना जोईस (Archana Jois) या अभिनेत्रीने. काही मिनिटांच्या तिच्या भूमिकेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

KGF 2 : रॉकीभाईच्या आईची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री रिअल लाईफमध्ये आहे भलतीच ग्लॅमरस
अगर तुम्हारे अंदर हिंमत है और हजार लोग तुम्हारे पीछे खडे हैं तो तुम सिर्फ जंग जीतोगे... लेकिन अगर हजार लोगों ने हिंमत जुटा ली कि तुम सामने खडे हो तो तुम पूरी दुनिया जीत लोगे..., हा डायलॉग तुम्हाला आठवत असेलच. ‘केजीएफ 1’मधील (KGF Chapter 1) या एका डायलॉगने अख्ख्या सिनेमाचा पट लिहिला. मृत्यूच्या उंबरठ्यावर आईने रॉकीकडून जिंकून येण्याचं वचन घेतलं नसतं तर रॉकी भाई जन्मलाच नसता.
रॉकीच्या आईची भूमिका छोटी होती पण प्रभावी होती. ही भूमिका साकारली होती अर्चना जोईस (Archana Jois) या अभिनेत्रीने. काही मिनिटांच्या तिच्या भूमिकेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. आज आम्ही तिच्याच बद्दल सांगणार आहोत.
केजीएफ 1 या सुपरडुपर हिट सिनेमात रॉकीच्या (साऊथ सुपरस्टार यश) आईची भूमिका 27 वर्षांची कन्नड अभिनेत्री अर्चना जोईसने साकारली होती.
अर्चना जोईस अनेक वर्षांपासून साऊथ सिनेमात अॅक्टिव्ह आहे. बेंगळुरूमध्ये जन्मलेल्या अर्चनाला कॉलेजमध्ये असताना अभिनयात रूची निर्माण झाली आणि शिक्षण पुर्ण करून तिने अभिनयात पदार्पण केलं.
चित्रपटांत, टीव्हीवर छोटे छोटे रोल करून स्वबळावर तिनं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. करिअरच्या सुरूवातीला दर्गा व महादेवी या मालिकेत तिला संधी मिळाली. यानंतर अनेक कन्नड सिनेमात तिने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. पण तिला खरी ओळख मिळाली ती केजीएफ 1 या चित्रपटाने. हा सिनेमा तिच्या करिअरमधील टर्निंग प्वाइंट ठरला. या चित्रपटानंतर तिला अनेक ऑफर मिळाल्या. 2019 मध्ये ती ‘विजयरथा’ या सिनेमात झळकली. नक्शे, राजकुमार, कलनाटका यासारख्या सिनेमात ती झळकली. लवकरच अर्चना ‘केजीएफ 2’ या चित्रपटातही दिसणार आहे.