घटस्फोटानंतरही Naga Chaitanyaने शेअर केला समांथासोबत तो खास फोटो, जुन्या आठवणींना असा दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 01:21 PM2023-02-27T13:21:44+5:302023-02-27T13:46:13+5:30

नागा आणि समांथाचा घटस्फोट घेऊन बरेच दिवस उलटून गेले आहेत. दरम्यान नागाने समांथासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Ye maya chesave turns 13 naga chaitanya and samantha ruth prabhu celedrated with this post | घटस्फोटानंतरही Naga Chaitanyaने शेअर केला समांथासोबत तो खास फोटो, जुन्या आठवणींना असा दिला उजाळा

घटस्फोटानंतरही Naga Chaitanyaने शेअर केला समांथासोबत तो खास फोटो, जुन्या आठवणींना असा दिला उजाळा

googlenewsNext

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. आता या घटनेला बरेच दिवस उलटून गेले असले तरी या दोघांची सोशल मीडियावर वारंवार चर्चा ऐकायला मिळत असते. त्यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या नात्याबद्दलही बरेच काही बोलले गेले पण तरी या दोघांनी एकमेकां विरोधात काहीच वक्तव्य केले नाही. दरम्यान नागाने समांथासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

समांथाने आपल्या करिअरची सुरुवात तेलुगु चित्रपट 'ये माया चेसावे'मधून केली होती. या चित्रपटाला रिलीज होऊन १३ वर्षे पूर्ण झाली आबेत. या चित्रपटात तिची जोडी नागा चैतन्यसोबत होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती आणि हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला. पहिल्यांदाच या स्टार्सची जोडी चित्रपटाच्या पडद्यावर आली आणि प्रेक्षकांनीही त्यांना भरभरून प्रेम दिले. या चित्रपटाला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने नागा चैतन्यने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाशी संबंधित काही पोस्टर्स शेअर केले आहेत.

नागाने दिला जुन्या आठवणींना उजाळा 
नागा चैतन्यने पोस्टरद्वारे सोशल मीडियावर शेअर करून या चित्रपटाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 2010 मध्ये रिलीज झालेल्या, ये माया चेसवेने सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य या चित्रपटाच्या माध्यमातून  पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. 

दरम्यान, नागा चैतन्यने त्याच्या आगामी तामिळ-तेलुगू चित्रपट 'कस्टडी'च्या शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात शूट रॅपची घोषणा केली आहे. व्यंकट प्रभू दिग्दर्शित या चित्रपटात क्रिती शेट्टी मुख्य भूमिकेत आहे.

दुसरीकडे, समंथा रुथ प्रभू सध्या 'सिटाडेल' इंडियाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये अभिनेत्री वरुण धवनसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. समंथाचा 'शकुंतलम' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला असून चाहते तिच्या 'कुशी' चित्रपटाचीही वाट पाहत आहेत.

Web Title: Ye maya chesave turns 13 naga chaitanya and samantha ruth prabhu celedrated with this post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.