​या कारणामुळे अमिताभ बच्चन यांच्या घरी यंदा रंगपंचमी खेळली जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2017 08:27 AM2017-03-11T08:27:57+5:302017-03-11T13:57:57+5:30

अमिताभ बच्चन यांच्या घरातील रंगपंचमी ही खास मानली जाते. गेल्या अनेक वर्षापासून ते आपल्या बंगल्यात रंगपंचमी खेळण्यासाठी इंडस्ट्रीतील लोकांना ...

This year, Amitabh Bachchan's home will not be played at Rangpanchi this year | ​या कारणामुळे अमिताभ बच्चन यांच्या घरी यंदा रंगपंचमी खेळली जाणार नाही

​या कारणामुळे अमिताभ बच्चन यांच्या घरी यंदा रंगपंचमी खेळली जाणार नाही

googlenewsNext
िताभ बच्चन यांच्या घरातील रंगपंचमी ही खास मानली जाते. गेल्या अनेक वर्षापासून ते आपल्या बंगल्यात रंगपंचमी खेळण्यासाठी इंडस्ट्रीतील लोकांना बोलावतात. रंगपंचमीसोबतच त्यांच्यासाठी जंगी पार्टी देण्यात येते. त्यामुळे रंगपंचमीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी त्यांच्या घरी हजेरी लावतात. अमिताभच्या घरातील रंगपंचमी सेलिब्रेशनचे निमंत्रण मिळावे अशी सगळ्याच बॉलिवूड मंडळींची इच्छा असते. पण यंदा अमिताभ बच्चन यांच्या घरात रंगपंचमी खेळली जाणार नाहीये. 
अमिताभ बच्चन किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून याबाबत काहीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी अमिताभ यांच्या घरी यंदा रंगपंचमी साजरी केली जाणार नसल्याची चांगलीच चर्चा आहे. 
अमिताभ बच्चन यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचे वडील कृष्णाराज राय हे गेल्या कित्येक दिवसांपासून रुग्णालयात आहे. त्यांची तब्येत अतिशय नाजूक असल्याचे म्हटले जात आहे. याच कारणामुळे यंदा रंगपंचमी सादरी करायची नाही असे बच्चन परिवाराने ठरवले असल्याचे म्हटले जात आहे. 
ऐश्वर्या रायच्या वडिलांना काही दिवसांपूर्वी रुग्णायलाय दाखल करण्यात आले होते. पण सध्या ते आयसीयुत असून डॉक्टर त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनदेखील सतत रुग्णायलात जाऊन त्यांना भेटत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचे फोटेदेखील रुग्णायलायच्या बाहेर टिपण्यात आले होते. ऐश्वर्याचे वडील रुग्णालयात दाखल झाल्यापासून इंडस्ट्रीतील अनेकजण रुग्णायलात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. 
बच्चन कुटुंबीच्या घरी दरवर्षी रंगपंचमीप्रमाणेच होळीचे दहन केले जाते. यावर्षी होळीचे दहन केले जाणार असले तरी त्यांच्या कुटुंबात रंगपंचमी खेळली जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. 

Web Title: This year, Amitabh Bachchan's home will not be played at Rangpanchi this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.