YEAR ENDER 2019 : यंदाचे नवे चेहरे... पहिलाच सिनेमा ठरला ‘पकाऊ’!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 08:00 AM2019-12-28T08:00:00+5:302019-12-28T08:00:02+5:30
बॉलिवूडमध्ये दरवर्षी नवे चेहरे येतात. 2019 मध्येही बॉलिवूडमध्ये अनेक नव्या चेह-यांची एन्ट्री झाली.
बॉलिवूडमध्ये दरवर्षी नवे चेहरे येतात. 2019 मध्येही बॉलिवूडमध्ये अनेक नव्या चेह-यांची एन्ट्री झाली. यात काही स्टार किड्स तर काही आऊट साईर्ड्सही दिसले. हे नवे चेहरे कोण, यावर एक नजर
अनन्या पांडे
चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिने यंदा पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित ‘स्टुडन्ट ऑफ द इयर 2’ मधून बॉलिवूड डेब्यू केला. पण दुर्दैवाने अनन्याचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. अर्थात अनन्याचे काम आणि तिचा सुंदर चेहरा नक्कीच भाव खाऊन गेला. पहिला सिनेमा फ्लॉप ठरूनही तिच्याकडे दिग्दर्शकांची रांग लागली.
तारा सुतारिया हिनेही अनन्या पांडेसोबत ‘स्टुडन्ट ऑफ द इयर 2’ मधून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली. हॉट लुक्स आणि डान्सिंग स्किलच्या जोरावर ताराने लगेच जम बसवला. आज तिच्याकडे अनेक ऑफर आहेत.
मिझान जाफरी
अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरी संजय लीला भन्साळीच्या बॅनरखाली बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. ‘मलाल’ या सिनेमात तो झळकला. पहिला चित्रपट फ्लॉप झाला. पण मिझान भाव खाऊन गेला.
शर्मिन सेगल
शर्मिन ही संजय लीला भन्साळींची भाची. भन्साळींनी शर्मिनला ‘मलाल’द्वारे लॉन्च केले. पण हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.
करण कपाडिया
डिम्पल कपाडियाची बहीण सिंपल कपाडियाचा मुलगा करणने ‘ब्लँक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण सनी देओल सोबत आलेला हा थ्रीलर सिनेमा प्रेक्षकांमध्ये आणि स्क्रीनवर थ्रील निर्माण करू शकला नाही.
सई मांजरेकर
‘दबंग’ फ्रेन्चाइजीच्या तिस-या भागात अर्थात ‘दबंग 3’ या सिनेमातून महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकर हिने आपला डेब्यू केला. चुलबुल पांडे अर्थात सलमान सोबत सई आॅन स्क्रीन रोमान्स करताना दिसली.
जहीर इक्बाल
जहीर इक्बाल म्हणजे सलमानच्या मित्राचा मुलगा. सलमानने ‘नोटबुक’ या सिनेमाद्वारे जहीरला लॉन्च केले. हा सिनेमा दणकून आपटला.
प्रनूतन बहल
मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल हिने ‘नोटबुक’द्वारे डेब्यू केला. पण तिचा पहिला सिनेमा फार कमाल दाखवू शकला नाही.
सनी देओलने मुलगा करण देओलला अगदी वाजतगाजत लॉन्च केले. ‘पल पल दिल के पास’ या सिनेमातून करणची एन्ट्री झाली. खुद्द सनी देओलने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. पण हा सिनेमाही आपटला.
सहर बांबा
‘पल पल दिल के पास’ या सिनेमात करण देओलसोबत सहर लांबा हा नवा चेहरा दिसला. पण सहरचा पहिला चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला.
अभिमन्यू दसानी
मैंने प्यार किया या सिनेमाची हिरोईन भाग्यश्री हिचा मुलगा अभिमन्यूने याचवर्षी ‘मर्द को दर्द नहीं होता’द्वारे डेब्यू केला. हा चित्रपटही आपटला.
वर्दन पुरी
अमरिश पुरी यांचा नातू वर्दन पुरी याने ‘ये साली आशिकी’ द्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 22 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज झाला. पण प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली.