Year Ender 2021: वरुण धवनपासून ते कतरिना कैफ, अंकिता लोखंडेपर्यंत, सेलिब्रेटींनी बांधली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 01:31 PM2021-12-21T13:31:48+5:302021-12-21T13:38:49+5:30
2021 मध्ये सर्वात जास्त लग्नाची चर्चा झाली ती कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाची.दोघांनीही आपलं लग्न गुपित ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मीडियाच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत. लग्नाच्या तारखेपासून ते ठिकाणापर्यंतच्या बातम्या व्हायरल होत असतानाच दोघांनीही लग्न केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २०२१ हे वर्ष काहींसाठी खास ठरलं, तर काहींसाठी अनलकी ठरलं.या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी लग्न केले तर काहींचे अनेक वर्षांचे नाते संपुष्टात आले. 2021 मध्ये सर्वात जास्त लग्नाची चर्चा झाली ती कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाची.दोघांनीही आपलं लग्न गुपित ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मीडियाच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत. लग्नाच्या तारखेपासून ते ठिकाणापर्यंतच्या बातम्या व्हायरल होत असतानाच दोघांनीही लग्न केले.
वरुण धवनने (Varun Dhawan) 2021 मध्ये लग्न केले. वरुण धवनने (Natasha Dalal) त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत 24 जानेवारीला पूर्ण रितीरिवानुसार लग्नगाठ बांधली. नताशा दलाल प्रेग्नंट असल्याची बातमी अलीकडेच व्हायरल झाली होती पण ती अफवा ठरली.
या वर्षाच्या सुरुवातीला दिया मिर्झाने(Dia Mirza) वैभव रेखीसोबत लग्न करून लोकांना आश्चर्यचकित केले होते. दिया मिर्झा आणि वैभव रेखीने (Vaibhav Rekhi) यावर्षी १५ फेब्रुवारीला सात फेरे घेतले. एका महिला पुरोहिताने हे लग्न लावले होते. त्यामुळे या लग्नाचीही जास्त चर्चा झाली. दियानेही थेट लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही खुशखबर सांगितली होती. यानंतर दिया एका मुलाची आई देखील झाली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम(Yami Gautam) आणि दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) याचवर्षी ४ जून रोजी विवाहबद्ध झाले. दोघेही बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते आणि कोणाला याची खबरही लागली नव्हती. दोघांनीही यामीच्या गावी अत्यंत साधेपणाने लग्न केले होते.
बॉलिवूड अभिनेते राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekha) यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली. 15 नोव्हेंबर 2021 रोजी राजकुमार राव यांनी पत्रलेखासोबत चंदीगडमध्ये थाटात लग्न केले.
टीव्हीपासून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या अंकिता लोखंडेचे(Ankita Lokhande) लग्नही वर्षभर चर्चेत राहिले. अंकिता लोखंडे आणि विकी जैन (Vicky Jain) 14 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. लग्नाचे सर्व विधी मोठ्या थाटामाटात पार पडले ज्यात बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.आता नवीन वर्षातही कोणते सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकतील हे पाहणे तितकंच रंजक असणार आहे.