आठवणींच्या मिठाईचा डबा... 'ये जवानी है दिवानी' पुन्हा रिलीज झाला, करण जोहरची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:05 IST2025-01-03T16:04:07+5:302025-01-03T16:05:07+5:30
सध्या अनेक सिनेमे रि रिलीज होत आहेत. त्यातच आजपासून 'ये जवानी है दिवानी' देखील पुन्हा प्रदर्शित झाला आहे.

आठवणींच्या मिठाईचा डबा... 'ये जवानी है दिवानी' पुन्हा रिलीज झाला, करण जोहरची पोस्ट
तरुणाईच्या आवडत्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'ये जवानी है दिवानी' (Yeh Jawani Hai Deewani). अयान मुखर्जीने सिनेमा दिग्दर्शित केला होता तर करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनखाली याची निर्मिती झाली. सध्या अनेक सिनेमे रि रिलीज होत आहेत. त्यातच आजपासून 'ये जवानी है दिवानी' देखील पुन्हा प्रदर्शित झाला आहे. प्रेम, स्वप्न ,मैत्री, दीवानगी अशा सगळ्या गोष्टींवर सिनेमा आधारित आहे. तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा आहे. याच्या रि रिलीजनंतर करण जोहर भावुक झाला आहे.
२०१३ साली आलेला 'ये जवानी है दिवानी' सिनेमाने तरुणाईला वेड लावलं होतं. आजही सिनेमा सतत पाहिला जातो. निर्माता करण जोहरने रि रिलीजचा आनंद व्यक्त करत व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सिनेमातील एकापेक्षा एक सीन्स आहेत. यासोबत त्याने लिहिले, 'आठवणींच्या मिठाईच्या डब्याची चव पुन्हा चाखण्याची ही तीच वेळ आहे.'
'ये जवानी है दिवानी' रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, कल्की कोचलीन आणि आदित्य रॉय कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली. हे चौघेही मनालीला ट्रेकसाठी जातात. यानंतर आपापल्या आयुष्यात व्यस्त होतात पण ती ट्रीप त्यांच्या कायम लक्षात राहते. सिनेमातील गाणीही खूप गाजली होती. एकदंर तरुणांसाठी बनवलेला हा सिनेमा आजही सर्वांच्या कायम लक्षात राहिला आहे.