YJHD Re release: 'ये जवानी है दिवानी'च्या 'बत्तमीज दिल' गाण्यावर थिएटरमध्ये प्रेक्षकांचा डान्स, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 10:27 IST2025-01-04T10:26:46+5:302025-01-04T10:27:06+5:30
'ये जवानी है दिवानी' सिनेमा पुन्हा रिलीज झाल्यावर थिएटरमध्ये प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केलीय (yeh jawani hai deewani)

YJHD Re release: 'ये जवानी है दिवानी'च्या 'बत्तमीज दिल' गाण्यावर थिएटरमध्ये प्रेक्षकांचा डान्स, व्हिडीओ व्हायरल
'ये जवानी है दिवानी' सिनेमा हा पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज झाला. २०१३ साली रिलीज झालेला 'ये जवानी है दिवानी' सिनेमा काल ३ जानेवारील थिएटरमध्ये पुन्हा रिलीज झाला. 'ये जवानी है दिवानी' पुन्हा रिलीज झाल्याची बातमी बाहेर येताच सर्व तरुणाईने सिनेमा पुन्हा पाहायला थिएटरमध्ये गर्दी केली. 'ये जवानी है दिवानी'चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत 'बत्तमीज दिल' गाण्यावर थिएटरमधील प्रेक्षक कल्ला करताना दिसत आहेत.
'ये जवानी है दिवानी' पाहताना थिएटरमध्ये कल्ला
'ये जवानी है दिवानी' सिनेमा थिएटरमध्ये पुन्हा रिलीज झाला. १२ वर्षांनी पुन्हा 'ये जवानी है दिवानी' रिलीज झाल्यावर थिएटरमध्ये पुन्हा प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केलीय. एका थिएटरमधील व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत 'ये जवानी है दिवानी'मधील 'बत्तमीज दिल' गाण्यावर प्रेक्षकांनी कल्ला केला. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत थिएटरमध्ये सिनेमा पाहायला आलेले प्रेक्षक धमाल नाचताना दिसले.
The last and probably the BIGGEST SUPERSTAR OF HINDI CINEMA - RANBIR KAPOOR..!!!
— Filmy Explorer (@filmyexplorer) January 3, 2025
He's going to give a ₹6 cr opening in re-release with '#YehJawaaniHaiDeewani'..!! Just have a look at the craze in cinemas even after 11 years...✨pic.twitter.com/OFBKOVbHsF
'ये जवानी है दिवानी' पुन्हा रिलीज
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'ये जवानी है दिवानी' पुन्हा रिलीज झालाय. या सिनेमाने पहिल्या दिवशी १ कोटी २५ लाखांची कमाई केलीय. पुन्हा एकदा बनी, नैना आणि त्याच्या मित्रांना पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. 'ये जवानी है दिवानी' सिनेमात रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, कल्की कोएचलीन, आदित्य रॉय कपूर, फारुक शेख या कलाकारांनी भूमिका साकारली होती. सिनेमातील गाणी, डायलॉग आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत.