​ होय, आमिर खानच्या ‘दंगल’ने मोडला आमिरच्याच ‘3इडियट्स’चा विक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 10:48 AM2017-09-24T10:48:45+5:302017-09-24T16:18:45+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘दंगल’ या सिनेमाची घोडदौड अजूनही सुरु आहे. रिलीजच्या नऊ महिन्यानंतरही  या चित्रपटाची लोकप्रीयता ...

Yes, Amir Khan's 'Dangl' hit Aamir's '3 Idiots' record! | ​ होय, आमिर खानच्या ‘दंगल’ने मोडला आमिरच्याच ‘3इडियट्स’चा विक्रम!

​ होय, आमिर खानच्या ‘दंगल’ने मोडला आमिरच्याच ‘3इडियट्स’चा विक्रम!

googlenewsNext
लिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘दंगल’ या सिनेमाची घोडदौड अजूनही सुरु आहे. रिलीजच्या नऊ महिन्यानंतरही  या चित्रपटाची लोकप्रीयता कमी झाली नाही. तेही भारतात नाही तर हाँगकाँगमध्ये. होय, ‘दंगल’ हा हाँगकाँगमध्ये सर्वाधिक कमाई करणारा आत्तापर्यंतचा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने हाँगकाँगमध्ये २३.४५ मिलियन हाँगकाँग डॉलर म्हणजे सुमारे २० कोटी रूपयांची कमाई केली आहे.
यंदा २४ आॅगस्टला हा चित्रपट हाँगकाँगमध्ये रिलीज झाला आणि पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने ५.२ मिलियन डॉलरची कमाई केली.  ‘बॉक्स आॅफिस इंडिया’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. आमिरच्याच ‘३ इडियट्स’ या चित्रपटाचा विक्रम ‘दंगल’ने मोडीत काढल्याचेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.  ‘३ इडियट्स’या चित्रपटाने हाँगकाँगमध्ये २३.४२ मिलियन हाँगकाँग डॉलर्सची कमाई केली होती. वर्ल्डवाईड या चित्रपटाने आत्तापर्यंत ३०० मिलियन डॉलरचा गल्ला जमवला आहे. 
 कुस्तीसारख्या पुरूषांचा दबदबा असलेल्या खेळात महावीर सिंह फोगट यांच्या मुलींनी इतिहास रचला.  फोगट बहिणींचा हा संपूर्ण प्रवास ‘दंगल’मध्ये दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात आमिरने महावीर सिंहची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली होती. 

ALSO READ : SONG Main Kaun Hoon!! ​आमिर खानच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’चे पहिले गाणे तुम्ही ऐकले?

कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या भूमिकेत पूर्णपणे सरमिसळून गेलेल्या आमिरने त्यांचे वयोवृद्ध व तरुणपणातील रुप जीवतोड अंगमेहनत घेऊन कमावले होते. शिवाय कुस्तीचे डाव आणि हरयाणवी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठीदेखील त्याने अपार कष्ट घेतले होते.
चित्रपटात आमिर अधिकतर वेळ फोगट यांच्या उतारवयातील भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यासाठी त्याला ९०-९५ किलोपर्यंत वजन वाढवावे लागले. एवढ्या वजनामुळे त्याला अनेकदा श्वास घेण्यास त्रास व्हायचा. कुस्ती शिकत असताना तर कित्येक वेळा तो जखमी झाला. पण सर्वात कठीण गोष्ट म्हणजे, महावीर यांची तरूणपणातील भूमिका साकारण्यासाठी हेच वाढवलेले वजन आमिरला कमी करावे लागले. केवळ २५ आठवड्यांत २५ किलो वजन त्याने कमी केले होते.

Web Title: Yes, Amir Khan's 'Dangl' hit Aamir's '3 Idiots' record!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.