यस, आय ड्रिंक अॅण्ड स्मोक... श्वेता साळवेचे ट्रोलर्सला सणसणीत उत्तर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 08:29 PM2018-10-29T20:29:27+5:302018-10-29T20:31:36+5:30
टीव्ही अभिनेत्री श्वेता साळवे अलीकडे प्रचंड ट्रोल झाली. श्वेताने नुकताच स्वत:चा एक बोल्ड फोटो शेअर केला होता.तिचा हा बोल्ड फोटो पाहून ट्रोलर्स तिच्यावर अक्षरश: तुटून पडले होते.
टीव्ही अभिनेत्री श्वेता साळवे अलीकडे प्रचंड ट्रोल झाली. श्वेताने नुकताच स्वत:चा एक बोल्ड फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्या एका हातात मद्याचा पेला होता आणि दुस-या हातात सिगारेट. सिगारेटचे झुरके घेताना ती दिसली होती. तिचा हा बोल्ड फोटो पाहून ट्रोलर्स तिच्यावर अक्षरश: तुटून पडले होते. अनेकांनी तर तिला ‘वाईट आई’ म्हटले होते. या ट्रोलर्सला श्वेताने सडेतोड उत्तर दिले आहे.
होय, श्वेताने पुन्हा एकदा स्वत:चा बोल्ड फोटो शेअर करत, या हेटर्सच्या टीकेला परखड उत्तर दिले आहे. इन्स्टाग्रामवर एक भलीमोठी पोस्ट शेअर करत तिने लिहिलेय की, आज माझ्या फोटोवर लोकांनी अतिशय वाईट कमेंट्स दिल्यात. अशा कमेंट्सकडे मी सर्रास दुर्लक्ष करते. पण आज मी बोलायचे ठरवलेय. होय,मी ड्रिंक्स आणि स्मोक करते. मी ते जगासमोर मान्य करते. पण या गोष्टीवरून मला जज करण्याचा, मी कशी आई आहे हे ठरवण्याचा कुणालाही अधिकार नाही. काही गोष्टींमुळे मी एक वाईट व्यक्ति आणि एक वाईट आई करू बनू शकते? मला स्वत:चे आयुष्य बर्बाद करताना तुम्ही पाहिले आहे का?माझ्या मुलाकडे दुर्लक्ष करतांना मला बघितले आहे का? मला कधी बेरोजगार पाहिले आहे का? मी काम करते आणि अनेक कामे करते. मी एक अभिनेत्री आहे, मी डान्सर आहे मी एक उद्योजिका आहे. मी आपल्या या शानदार देशातील दोन मोठ्या शहरात राहते. माझ्याकडे चांगले मित्र आहेत. मी त्यांच्यावर प्रेम करते आणि माझ्यावरही ते तितकेच प्रेम करतात. मी हे सांगताना थोडी आक्रमक वाटेल. पण तरिही मी सांगते की, माझ्या मुलावरून माझ्याकडे बोट दाखवण्याची हिंमत करू नका. माझ्या आई-वडिलांनी मला चांगले संस्कार दिलेत. चांगले-वाईट यात फरक करायला शिकवले. तेही सिगारेट ओढतात, मद्य पितात. पण मला आणि माझ्या भावाला वाढवतांना त्यांनी कुठलीही कसूर केली नाही. एका योग्य वयापर्यंत आपण सिगारेट-मद्याचे सेवन करू शकणार नाही, हे आम्हाला ठाऊक होते. मोठे झाल्यानंतरच आम्हाला या गोष्टीची परवानगी मिळणार होती. आज मी माझ्या पालकांसोबत ड्रिंक्स घेते. त्यांनी मला एक शानदार बालपण आणि जीवन दिले, याचा मला अभिमान आहे. हेच मी माझ्या मुलांना देऊ इच्छिते. लाईक्स आणि फॉलोअर्सची मला चिंता नाही. मला फॉलो करायचे की नाही, हे तुम्ही ठरवा. तुम्हाला वाटते तशी मी नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर मला खुश्शाल अनफॉलो करा. जगा आणि जगू द्या,’ असे श्वेताने म्हटले आहे.