होय, यापुढे ऋषी कपूर यांना ट्रोल करण्यापूर्वी करा दहादा विचार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 07:54 AM2018-01-25T07:54:25+5:302018-01-25T13:24:55+5:30

ऋषी कपूर यांचा संताप आपण अनेकदा बघितला आहे. अगदी अलीकडे एक चाहती ऋषी कपूरच्या संतापाला बळी पडली होती. या ...

Yes, Rishi Kapoor should be trolled before the troll !! | होय, यापुढे ऋषी कपूर यांना ट्रोल करण्यापूर्वी करा दहादा विचार!!

होय, यापुढे ऋषी कपूर यांना ट्रोल करण्यापूर्वी करा दहादा विचार!!

googlenewsNext
ी कपूर यांचा संताप आपण अनेकदा बघितला आहे. अगदी अलीकडे एक चाहती ऋषी कपूरच्या संतापाला बळी पडली होती. या चाहतीने सेल्फीसाठी आग्रह धरणे ऋषी यांना आवडले नव्हते आणि त्यांच्यातील ‘जमदग्नी’ जागृत झाला होता. सोशल मीडियावर व्यक्त होतानाही ऋषी कपूर यांचा अनेकदा तोल जातो. यावरून त्यांना अनेकदा ट्रोल व्हावे लागलेय. पण आता   ऋषी यांना ट्रोल करताना तुम्हाला दहादा विचार करावा लागणार आहे. होय, कारणही तसेच आहे. ऋषी कपूर यांनी ट्रोलर्सला सक्त ताकिद दिली आहे. 
अलीकडे एका ताज्या मुलाखतीत ऋषी कपूर यांनी ट्रोलर्सला फैलावर घेत, त्यांना एकप्रकारे तंबीचं दिली. मला वा माझ्या कुटुंबाला कुणीही वेडेवाकडे बोलू शकत नाही. सोशल मीडियावर असो वा माझ्या पर्सनल लाईफमध्ये मला वाटते, तसाच मी राहणार,तसाचा वागणार आणि मनाला वाटते तेच लिहिणार, तेच बोलणार. कारण मला अभिव्यक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे. ही लोकशाही आहे आणि त्यामुळे मला वाटते तेच मी करणार. मी व्यक्तिश: कुणालाही लक्ष्य करत नाही. संवेदनशील विषयावर मी कधीही आंदोलन उभारले नाही. त्यामुळे माझ्याबद्दल कुणाला तक्रार असण्याचा प्रश्नच नाही. ट्रोलर्सला मी अजिबात भाव देत नाही. त्यांच्या शब्दांवर रिअ‍ॅक्ट होणे म्हणजे त्यांना नाहक महत्त्व देणे ठरते. त्यामुळे मी अशांची पर्वा करत नाही. तुम्ही ट्रोल करता तिथपर्यंत ठीक आहे. पण मला वा माझ्या कुटुंबाला तुम्ही जाहीरपणे शिव्या घालत असाल तर मी काहीही करणार नाही. केवळ अशांना ब्लॉक करेल. मला शिव्या घालणारे मला पाहू शकणार नाहीत, फॉलो करू शकणार नाहीत, हा त्याचा अर्थ होतो, असे ऋषी कपूर यांनी म्हटले. आत्तापर्यंत मी पाच हजार ट्रोलर्सना ब्लॉक केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

ALSO READ : ​ऋषी कपूर यांचा गेला ‘तोल’; मुलगा रणबीर कपूरला मागावी लागली माफी!

एकंदर काय तर ऋषी यांनी ट्रोलर्सला ब्लॉक करण्याचा सिंपल फंडा शोधून काढला आहे. ज्यांना ब्लॉक व्हायचे नसेल किमान त्यांनी तरी ऋषी कपूर यांना ट्रोल करण्यापूर्वी दहादा विचार केलेलाच बरा. होय ना?

Web Title: Yes, Rishi Kapoor should be trolled before the troll !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.