​होय, एकाच वेळी नऊ शहरांत दिसणार शाहरुख!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2016 05:42 PM2016-11-27T17:42:08+5:302016-11-27T17:42:08+5:30

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याचा ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाला चांगली ओपनिंग ...

Yes, Shah Rukh will appear in nine cities at once! | ​होय, एकाच वेळी नऊ शहरांत दिसणार शाहरुख!

​होय, एकाच वेळी नऊ शहरांत दिसणार शाहरुख!

googlenewsNext
ong>बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याचा ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली असतानाच शाहरुख खान आपल्या चाहत्यांना आणखी एक आगळी वेगळी भेट देणार आहे. शाहरुखच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटाचा ट्रेलर ७ डिसेंबर २०१७ ला प्रदर्शित केला जाणार आहे. विशेष म्हणजे केवळ एक किंवा दोन शहरांत नव्हे तर नऊ शहरांत एकाच वेळी ‘रईस’चे ट्रेलर लाँच केले जाणार आहे. 

सध्या ‘रईस’च्या ट्रेलर लाँचची जोरदार तयारी सुरू आहे. खरे तर ‘दंगल’, ‘काबील’ व ‘रईस’ यांच्यात ट्रेलर लाँच वरून स्पर्धा सुरू होती. मात्र यात आमीरच्या ‘दंगल’ने बाजी मारली. याच पाठोपाठ ‘काबील’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. यानंतर शाहरुख आपल्या वाढदिवशी ‘रईस’चा ट्रेलर लाँच करेल अशी चर्चा होती. मात्र आता निर्मात्यांनी आपला विचार बदलला असून एकाच वेळी देशभरातील ९ शहरांत ‘रईस’चा ट्रेलर लाँच केला जाईल. मुंबईमध्ये  ‘रईस’चा ट्रेलर लाँच करीत शाहरूख देशातील न्ऊ विविध शहरांत आयोजित केलेल्या ट्रेलर लाँचला व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून हजेरी लावेल. याचवेळी मुंबईमध्ये आयोजित ‘रईस’च्या ट्रेलर लाँचचे   दिल्ली, इंदूर, अहमदाबाद, कोलकाता, बेंगलुरु, हैदराबाद, जयपूर व पंजाब मधील मोगा या शहरांत प्रक्षेपण केले जाईल.
 
शाहरुख खानच्या होम प्रोडक्शनच्या ‘रईस’चे दिग्दर्शन राहुल ढोलकिया करीत आहेत.  हा चित्रपट सलमान खानच्या ‘सुल्तान’ सोबत प्रदर्शित होणार होता. मात्र बॉक्स आॅफिसवर संघर्ष नको म्हणून चर्चेतूना तोडगा काढण्यात आला. आता हा चित्रपट २६ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते. त्याच दिवशी हृतिक रोशनचा ‘काबील’ प्रदर्शित होत असल्याने ‘रईस’च्या प्रदर्शनाची तारीख आणखी बदलणार,अशी चर्चा आहे. पण खरे काय ते ट्रेलर रिलीज झाल्यावरच कळणार.

Raees screens across nine cities

Web Title: Yes, Shah Rukh will appear in nine cities at once!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.