Yo Yo ...crosses 200 million views...हनी सिंहच्या ‘या’ गाण्याने केला रेकॉर्ड!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 07:53 AM2017-02-15T07:53:09+5:302017-02-15T13:24:47+5:30
रॅपर हनी सिंह आपल्या गत अनुभवातून बरेच काही शिकला आहे आणि पुन्हा धमाकेदार वापसीसाठी तयार आहे. तोही तितक्याच धमाकेदार रेकॉर्डसह. होय, यो योचे ‘धीरे धीरे मेरे जिंदगी मे आना...’ हे गाणे आत्तापर्यंत यूट्युबवर २० कोटी लोकांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलेय. हा एक विक्रम आहे.
र पर हनी सिंह गेल्या काही काळापासून लाईम लाईटमध्ये नाही, हे तर खरे आहे. अर्थात अद्यापही त्याची फॅन फॉलोर्इंग कमी झालेली नाही. पण काही वादांमुळे हनीच्या लोकप्रियतेला काहीसी ओहटी लागली, हे मात्र तितकेच खरे. पण कदाचित हनी सिंह आपल्या गत अनुभवातून बरेच काही शिकला आहे आणि पुन्हा धमाकेदार वापसीसाठी तयार आहे. तोही तितक्याच धमाकेदार रेकॉर्डसह. होय, यो योचे ‘धीरे धीरे मेरे जिंदगी मे आना...’ हे गाणे आत्तापर्यंत यूट्युबवर २० कोटी लोकांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलेय. हा एक विक्रम आहे.
हनी सिंह गेल्या गत काळात वादात सापडला होता. गत काळात सुमारे दीड वर्षे योयो बॉलिवूडमधून पुरता गायब झाला होता. यादरम्यान त्याच्याबद्दल नाही नाही त्या अफवांचे पीक आले होते. पण यानंतर एका मुलाखतीत याकाळात त्याच्यासोबत काय काय घडले, हे हनीने जगासोबत शेअर केले होते. बॉलिवूडमधून काही काळ मी गायब होतो. बायपोलर डिसआॅर्डरशी माझी झुंज सुरु होती. यादरम्यान मी चार डॉक्टर बदलले. औषधांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नव्हता. मी अक्षरश: वेडा झालो होतो. ते १८ महिने माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते. मी रिहॅब सेंटरमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण मी नोएडातील माझ्या घरी होतो, असे हनीने या मुलाखतीत कबुल केले होते. बायपोलर डिआॅर्डरमध्ये रूग्णाचे मूड क्षणाक्षणाला बदलते. कधी पराकोटीचा आनंद तर कधी घोर निराशा, असे त्याचे मूड असते. याच आजारामुळे हनीसिंह मद्याच्या आहारी गेला. इतका की, त्याला हे व्यसन सोडवण्यासाठीही उपचार घ्यावे लागले होते. पण आता हनी पुन्हा नव्या आत्मविश्वासाने परतला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
ALSO READ : Yo Yo ...ही आहे हनी सिंगची पत्नी!
डिप्पी-रूबीचा हनी सिंगच्या गाण्यावर डान्स!
१९९० मध्ये आलेल्या ‘आशिकी’ या चित्रपटातील हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले होते. हनी सिंहने या सुपरहिट गाण्याचा रिमेक बनवला होता. हृतिक रोशन व सोनम कपूर यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले होते. हे गाणे लोकांना किती आवडले, याचा अंदाज या ताज्या विक्रमावरून लावता येऊ शकतो. ‘आशिकी’ या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात टी-सीरिजने या चित्रपटातील ‘धीरे धीरे मेरे जिंदगी मे आना...’ या गाण्याला नव्या अंदाजात सादर केले होते.