घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात! अभिनेत्रीला डेट करतोय हनी सिंग, 'ती' मिस्ट्री गर्ल नक्की कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 11:06 AM2024-07-12T11:06:56+5:302024-07-12T11:20:45+5:30

हनी सिंगचं नाव एका अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. 

Yo Yo Honey Singh In NOW Dating Actress heera sohhal After Breakup With Tina Thadani | घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात! अभिनेत्रीला डेट करतोय हनी सिंग, 'ती' मिस्ट्री गर्ल नक्की कोण?

घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात! अभिनेत्रीला डेट करतोय हनी सिंग, 'ती' मिस्ट्री गर्ल नक्की कोण?

पंजाबी गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगचा एक मोठा चाहतावर्ग आज देशभरात आहे. आपली गाण्याच्या हटके स्टाइल आणि स्वॅगमुळे हनी सिंगनं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हनी सिंग हा त्याच्या गाण्यांप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असतो.  रॅपर पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं बोललं जात आहे. हनी सिंगचं नाव एका अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. 

 हनी सिंग अभिनेत्री हीरा सोहलला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांना अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं आहे. हीरा ही मुंबईत हनी सिंगच्या कॉन्सर्टमध्येही दिसली होती. दोघेही जवळपास एका वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत.  गेल्या महिन्यात ते रोमँटिक ट्रिपवरही गेल्याची चर्चा आहे. हिरानं 'थँक गॉड'मध्ये काम केलं आहे. हीरा ही पंजाबमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेय तिनं अनेक म्युझिक व्हिडीओ, हिंदी वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. 

हनी सिंगवर त्याची पहिली पत्नी शालिनीने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. सप्टेंबर २०२२ मध्ये हनी सिंगने शालिनी तलवारला घटस्फोट दिला. हनी सिंग आणि शालिनी तलवार एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. दोघेही शाळेपासून एकमेकांना डेट करायचे. 20 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2011 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं. अखेर आपसातील मतभेदामुळे लग्नाच्या 12 वर्षांनंतर दोघे वेगळे झाले होते. 

शालिनीपासून वेगळं झाल्यानंतर हनी सिंगचं नाव टीना थडानीसोबत जोडलं गेलं होतं. पण त्यानंतर २०२३ मध्ये त्यांच्या ब्रेकअप झालं. जेव्हा हनी सिंग आणि टीना थडानी वेगळे झाले, तेव्हा दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं. यासोबतच एकमेकांसोबतचे फोटोही दोघांनी सोशल मीडियावरून हटवले होते. आता अखेर पुन्हा एकदा हनीच्या आयुष्यात प्रेम आलं आहे. 

Web Title: Yo Yo Honey Singh In NOW Dating Actress heera sohhal After Breakup With Tina Thadani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.