Yo Yo Honey Singh : हनी सिंग डिप्रेशनमधून बाहेर, म्हणाला 'कठीण काळात दीपिकानेच केली मदत, तर...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 17:02 IST2023-01-16T17:01:17+5:302023-01-16T17:02:20+5:30
लोकप्रिय रॅपर हनी सिंग त्याच्या कठीण काळाविषयी नुकतंच एका मुलाखतीत बोलला आहे.

Yo Yo Honey Singh : हनी सिंग डिप्रेशनमधून बाहेर, म्हणाला 'कठीण काळात दीपिकानेच केली मदत, तर...'
Yo Yo Honey Singh : लोकप्रिय रॅपर 'हनी सिंग' मधल्या काळात इंडस्ट्रीपासून दूर होता. बऱ्याच काळानंतर त्याने 'हनी 3.0' (Honey 3.0) हा अल्बम द्वारे कमबॅक केले आहे. मात्र मध्यंतरी तो डिप्रेशनमध्ये गेला होता असं जेव्हा समजलं तेव्हा चाहत्यांना धक्काच बसला. हनी सिंग त्याच्या कठीण काळाविषयी नुकतंच एका मुलाखतीत बोलला आहे. तसेच या कठीण काळात त्याला बॉलिवूडमधून कोणाकोणाची साथ मिळाली याचा देखील त्याने खुलासा केला आहे.
'यो यो हनी सिंग' देसी कलाकार या अल्बम नंतर अचानक गायब झाला. हनी सिंग डिप्रेशन मध्ये गेल्याची चर्चाही होऊ लागली. तो लाईमलाईटपासून पूर्णपणे लांब गेला. नुकतंच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले, ' माझ्या कठीण काळात मला अनेकांची साथी मिळाली. इंडस्ट्रीत सगळे खूप चांगले आहेत. दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) माझ्या कुटुंबाला दिल्लीतील एका चांगल्या डॉक्टरांचे नाव सुचवले. अक्षय कुमार (Akshay Kumar) पाजी नेहमी माझी फोन करुन विचारपूस करायचे. पण तेव्हा कोणाशी बोलावं अशी माझी इच्छाच नसायची. इतकंच काय शाहरुख खानने (Shahrukh Khan) देखील एकदा मला फोन केला होता.
यो यो हनी सिंग ने बॉलिवूडमध्ये अनेक रॅप सॉंग गायले आहेत. शाहरुख आणि दीपिकाच्या 'चेन्नई एक्सप्रेस' मधील प्रसिद्ध 'लुंगी डान्स' हे गाणं हनीचंच आहे. तर अक्षय कुमारच्या 'बॉस' सिनेमातील 'पार्टी ऑल नाईट' हे गाणं हनीने गायलं आहे. प्रत्येक पार्टीत हनी सिंगचं गाणं हे आवर्जून वाजतं. आता 'हनी ३.०' हा त्याचा नवीन अल्बम आला आहे. तसेच सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातही त्याचे गाणे असल्याची चर्चा आहे.