Yodha Teaser: 'योद्धा'चा टीझर रिलीज, पुन्हा दहशतवाद्यांशी लढणार सिद्धार्थ मल्होत्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 16:25 IST2024-02-19T16:25:22+5:302024-02-19T16:25:49+5:30
Yodha Teaser: सिद्धार्थ मल्होत्राचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'योद्धा'चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. सिद्धार्थ हातात बंदूक घेऊन दहशतवाद्यांशी कडवी झुंज देताना दिसत आहे.

Yodha Teaser: 'योद्धा'चा टीझर रिलीज, पुन्हा दहशतवाद्यांशी लढणार सिद्धार्थ मल्होत्रा
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या बहुप्रतिक्षित 'योद्धा' चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर दुबईमध्ये १३ हजार फूट उंचीवरून लाँच करण्यात आले. आता निर्मात्यांनी दमदार ॲक्शन सिक्वेन्ससह चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सिद्धार्थ मल्होत्राने हा टीझर त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'आम्ही फ्लाइट घेतली आहे... तुम्ही सर्वजण या हाय-ऑक्टेन ॲक्शनसाठी तयार व्हा...'
टीझरबद्दल सांगायचे तर, सिद्धार्थ मल्होत्रा फुल ऑन ॲक्शनमध्ये दिसत आहे. सिद्धार्थ हातात बंदूक घेऊन दहशतवाद्यांशी कडवी झुंज देताना दिसत आहे. तो एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना दिसत आहे, जिथे तो आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करताना दिसतो. अभिनेत्याचा हा डॅशिंग अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे. या टीझरलाही प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, हा चित्रपट इतिहास घडवणार आहे. तर अन्य काही युजरने टीझरला सुपरहिट म्हटले आहे.
चित्रपटाची कथा
योद्धा चित्रपटात एका योद्ध्याची कथा दाखवण्यात आली आहे, जो विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढतो आणि विमानात उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप परत आणतो. या योद्ध्याच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार असून तो एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे
या चित्रपटापूर्वी सिद्धार्थने 'शेरशाह'मध्ये सैनिकाची भूमिका साकारली होती. अशा परिस्थितीत आपल्या आवडत्या स्टारला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. या चित्रपटात दिशा पटानी पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांशिवाय राशी खन्ना देखील योद्धामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १५ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.