योगगुरू बाबा रामदेव यांच्यावरील बायोपिकची अजय देवगण करणार निर्मिती!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2017 04:36 PM2017-06-14T16:36:46+5:302017-06-14T22:09:17+5:30
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरू आहे. प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे बायोपिकचा फॉर्म्युला चांगलाच हिट होत असल्याने, आता अजय ...
ब लिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरू आहे. प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे बायोपिकचा फॉर्म्युला चांगलाच हिट होत असल्याने, आता अजय देवगणही त्यात नशीब अजमाविण्याचा विचार करीत आहे. ‘बादशाहो’, ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेला अजय लवकरच बायोपिकवर काम करण्यास सुरुवात करणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजय कोणावर बायोपिक करणार आहे? तर अजय चक्क योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर बायोपिक करण्याची तयारी करीत आहे. फरक फक्त एवढाच असेल की, ही बायोपिक पडद्यावर नव्हे तर टीव्हीवर मालिकेच्या स्वरूपात प्रेक्षकांना बघावयास मिळेल.
काही दिवसांपूर्वीच अजय संपूर्ण परिवारासह मालदीव येथे सुट्या एन्जॉय करण्यासाठी गेला होता. आता तो भारतात परतला असून, त्याने ‘बादशाहो’ आणि ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ‘गोलमाल अगेन’ येत्या दिवाळीला रिलीज होणार असल्याने त्याला या चित्रपटाची शूटिंग लवकरच पूर्ण करायची आहे. तर ‘बादशाहो’ची शूटिंग जवळपास पूर्ण झाली असल्याने तो बाबा रामदेव यांच्या जीवनावरील बायोपिकवर काम करण्याची शक्यता आहे.
मिररने दिलेल्या माहितीनुसार, अजय निर्माता अभिनव शुक्ला यांच्याबरोबर या प्रोजेक्टवर काम करीत आहे. या शोचे नाव ‘स्वामी बाबा रामदेव : द अनटोल्ड स्टोरी’ असे असणार आहे. ही मालिका रामदेव बाबा आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण यांच्या जीवनावर आधारित असेल. वृत्तानुसार या मालिकेच्या शूटिंगला या वर्षाच्या अखेरीस सुरुवात केली जाणार आहे. अजयने आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्येही त्याने नशीब अजमाविले आहे. त्यामुळे ही मालिका त्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण समजली जात आहे.
दरम्यान, अजयच्या निर्मिती करिअरचा विचार केल्यास ‘शिवाय’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला होता. त्याव्यतिरिक्त ‘सन आॅफ सरदार’, ‘सिंघम रिटर्न्स’ या चित्रपटाचाही प्रोड्यूसर म्हणून त्याने काम पाहिले आहे. बाबा रामदेव यांचा भक्त वर्ग लक्षात घेता ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी ठरू शकेल.