​हा अभिनेता बनला योगी... बॉलिवूडला दिली सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 05:41 AM2017-11-03T05:41:48+5:302017-11-03T11:11:48+5:30

प्यार तो होना ही था हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील काजोल आणि अजय देवगण यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच ...

Yogi became an actor ... left for Bollywood | ​हा अभिनेता बनला योगी... बॉलिवूडला दिली सोडचिठ्ठी

​हा अभिनेता बनला योगी... बॉलिवूडला दिली सोडचिठ्ठी

googlenewsNext
यार तो होना ही था हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील काजोल आणि अजय देवगण यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात राहुलच्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना बिजय आनंदला पाहायला मिळाले होते. काजोलचा प्रियकर असलेला राहुल प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. बिजयच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटाआधी बिजयने काही चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. यश चित्रपटात त्याच्यावर चित्रित झालेला सुबह सुबह जब खि़डकी खोलू... हे गाणे तर प्रचंड गाजले होते. बिजय प्यार किया तो डरना क्या या चित्रपटानंतर आपल्याल कधीच चित्रपटात दिसला नाही. बिजय आता काय करतोय हे तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. 
बिजय आनंद योगी बनला असून त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य हे योगसाधनेसाठी वाहून दिले आहे. याविषयी एशियन एज या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत बिजयने सांगितले होते, प्यार तो होना ही था या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर मला जवळजवळ २२ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर मिळाली होती. पण अभिनय करण्यात मला रसच नसल्याने मी इंडस्ट्री सोडली. मी गरिबी, स्ट्रगल खूपच जवळून पाहिला आहे. त्यामुळे एक प्रसिद्ध अभिनेता बनण्याची माझी इच्छा होती. पण मला चित्रपटांमुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर ही प्रसिद्धी, पैसा या सगळ्या निरर्थक गोष्टी असल्याचे मला जाणवले आणि मी ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आणि मी योग साधनेकडे वळलो. 
बिजय १७ वर्षं अभिनयक्षेत्रापासून दूर होता. गेल्या वर्षी त्याने अनेक वर्षांनंतर सिया के राम या मालिकेत जनकाची भूमिका साकारली होती. अनेक वर्षांनंतर बिजय अभिनयक्षेत्रात परतला असल्याचा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण या मालिकेत काम करण्यामागे एक खास कारण असल्याचे त्याने त्यावेळी सांगितले होते. तो म्हणाला होता की, सिया के राम या मालिकेतील जनकच्या भूमिकेसाठी केवळ मीच योग्य असल्याचे या मालिकेच्या टीमचे म्हणणे होते आणि त्यामुळेच मी या भूमिकेसाठी होकार दिला होता आणि जनक यांच्या व्यक्तिरेखेप्रमाणे मी खऱ्या आयुष्यातही आहे. त्याचमुळे मी या मालिकेच्या माध्यमातून अनेक वर्षांनी कॅमेऱ्यासमोर गेलो. 

Bijay Anand

Also Read : अजय देवगणसोबत लग्न करण्यापूर्वी काजोलचे याच्यासोबत होते अफेअर

Web Title: Yogi became an actor ... left for Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.