"तू मुस्लिम नाहीस तर ब्राम्हण!" इरफानचे वडील त्याला असं का म्हणायचे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 10:56 AM2024-04-29T10:56:12+5:302024-04-29T10:56:32+5:30
इरफान खानचे वडील त्याला ब्राम्हण असं का म्हणायचे? वाचा हा खास किस्सा (irrfan khan)
अभिनेता इरफान खानला विसरणं शक्य नाही. काही लोकांचं महत्व ते गेल्यावर कळतं. त्यातलाच एक व्यक्ती म्हणजे इरफान. इरफानने त्याच्या आयुष्याच्या कमी कालावधीत बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूडही गाजवलं. आज इरफानची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातला एक खास किस्सा. इरफान धर्माने मुस्लिम असूनही त्याचे वडील त्याला ब्राम्हण का म्हणायचे? जाणून घ्या
मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या इरफान खानला मांसाहार आवडत नव्हता, तो पूर्ण शाकाहारी होता. या वागणुकीमुळे लोकं इरफानला ब्राह्मण म्हणत. एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले होते की, तो लहानपणापासून शाकाहारी आहे आणि त्याला मांसाहार आवडत नाही. या कारणास्तव त्यांचे वडील त्यांना गंमतीने ब्राह्मण म्हणत. इरफानच्या वडिलांनी त्याला शिकारीला नेण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. पण इरफानला त्यात रस नव्हता. कारण इरफानला प्राण्यांची आवड होती.
इरफानने 'मकबूल', 'हिंदी मीडियम', 'हासील', 'तलवार', लंच बॉक्स, पिकू, बिल्लू बार्बर, ब्लॅकमेल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय हॉलिवूडच्या स्पायडरमॅन आणि ज्यूरासिक पार्क सिनेमांमध्ये इरफान झळकला. २९ एप्रिल २०२० ला कॅन्सरने इरफानचं निधन झालं. इरफानचा मुलगा बाबिल खान आता बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करतोय.