घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता एमी पुरस्कार विजेते सिनेमे आणि सीरिज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 03:29 PM2023-11-23T15:29:11+5:302023-11-23T15:33:41+5:30
आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये गणले जातात.
नुकतेच ५१ वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा न्यूयॉर्कमध्ये पार पडला. आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये गणले जातात. यामध्ये 20 देशांतील 56 उमेदवारांना 14 विविध श्रेणींमध्ये एमी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एमी पुरस्कारांने सन्मानित झालेले चित्रपट आणि वेब सीरिजची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. शिवाय ते तुम्ही कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता, हे जाणून घेऊया...
वीर दास: लँडिंग (Vir Das: Landing)
वीर दासला त्याचा नेटफ्लिक्स स्पेशल शो ‘वीर दास: लँडिंग’साठी बेस्ट कॉमेडी अवॉर्ड मिळाला. वीर दासचा हा चौथा स्टँड अप शो होता, जो अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात शूट झाला होता. तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Netflix वर हा स्टँड अप कॉमेडी शो पाहू शकता.
ला काइडा (La Caida)
यावर्षी एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कार्ला सुजा हिला ला काइडा या चित्रपटासाठी देण्यात आला आहे. लुसिया पुएन्झो दिग्दर्शित हा मेक्सिकन स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा एका महिला डायव्हरवर आधारित आहे, जिला ऑलिम्पिकमध्ये शेवटची संधी मिळते. OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.
डेरी गर्ल्स सीझन 3(Derry Girls season 3)
'डेरी गर्ल्स सीझन 3' ला बेस्ट यूनिक कॉमेडीसाठी एमी पुरस्कार मिळाला आहे. सात भागांमध्ये प्रदर्शित झालेली ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
मारियुपोल: द पीपल्स स्टोरी (Mariupol: The People's Story)
'मारियुपोल: द पीपल्स स्टोरी'ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा एमी पुरस्कार मिळाला आहे. हा डॉक्युमेंट्री फीचर फिल्म युक्रेनियन मारियुपोल शहरातील लोकांवर चित्रित करण्यात आली आहे. ज्यांना रशियन हल्ल्यानंतर आपल्या लोकांचे मृतदेह रस्त्यावर सोडावे लागले. ओटीटी प्लॅटफॉर्म ॲपल टीव्हीवर बीबीसीने बनवलेली ही डॉक्युमेंटरी प्रेक्षकांना पाहता येईल.
हार्ले ॲण्ड कात्या (Harley and Katya)
यावर्षीचा 'हार्ले ॲण्ड कात्या'ला सर्वोत्कृष्ट क्रीडा माहितीपटासाठी एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही डॉक्युमेंटरी ऑस्ट्रेलियन खेळाडू हार्ले विंडसर आणि एकटेरिना यांच्या कारकिर्दीचा जवळून आढावा घेते. नेटफ्लिक्सवर ही डॉक्युमेंटरी पाहता येईल.
द एम्प्रेस (The Empress)
सर्वोत्कृष्ट नाटक मालिकेचा एमी पुरस्कार 'द एम्प्रेस' या जर्मन वेबसिरीजला देण्यात आला आहे. ही एक ऐतिहासिक ड्रामा वेब सिरीज आहे, ज्याची कथा ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथ यांच्या जीवनावर आधारित आहे. 6 एपिसोडमध्ये रिलीज झालेली ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
हार्टब्रेक हाय (Heartbreak high)
'हार्टब्रेक हाय' या शोला सर्वोत्कृष्ट किड्स लाइव्ह ॲक्शनसाठी एमी अवॉर्ड देण्यात आला आहे. ही एक ऑस्ट्रेलियन कॉमेडी ड्रामा वेब सिरीज आहे. आठ भागांमध्ये बनलेली ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
द स्मेड्स अँड द स्मूज (The Smeds and The Smoos)
मॅजिक लाइट पिक्चर्स निर्मित 'द स्मेड्स अँड द स्मूज'ने सर्वोत्कृष्ट किड्स ॲनिमेशनसाठी एमी जिंकला. ओटीटी प्लॅटफॉर्म Apple TV वर उपलब्ध आहे.