"नजर काढलीच पाहिजे...", विकी कौशलच्या दृष्ट काढतानाच्या व्हिडीओवर मृणाल ठाकूरने दिली ही रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:11 IST2025-02-22T17:08:07+5:302025-02-22T17:11:05+5:30
Vicky Kaushal And Mrunal Thakur : विकी कौशलने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यात विकीच्या घरी काम करणाऱ्या ताईंनी त्याची दृष्ट काढली होती. आता हा व्हिडीओ मृणाल ठाकूरने इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

"नजर काढलीच पाहिजे...", विकी कौशलच्या दृष्ट काढतानाच्या व्हिडीओवर मृणाल ठाकूरने दिली ही रिअॅक्शन
विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता आणि हा चित्रपट रिलीज होऊन ८ दिवस पूर्ण झाले आहेत. छावा सिनेमाने जगभरात ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे आणि आपल्या बॉक्स ऑफिसवर २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. 'छावा' विकी कौशलच्या करिअरमध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. यापूर्वी विकीच्या करिअरमधील सर्वाधीक कमाई करणारा चित्रपट उरी द सर्जिकल स्टाइक होता. या सिनेमातील काम पाहून विकी कौशलचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे. नुकतेच विकीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यात विकीच्या घरी काम करणाऱ्या ताईंनी त्याची दृष्ट काढली होती. आता हा व्हिडीओ मृणाल ठाकूर(Mrunal Thakur)ने इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
विकी कौशलने नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात विकी कौशल घरात खोलीबाहेर उभा आहे. त्यांच्या घरातील मदनतीस आशा ताई आहेत ज्या साडी नेसून उभ्या आहेत. त्या विकीची दृष्ट काढताना दिसत आहे.
विकीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "आशा ताईंनी मला मोठे होताना पाहिलंय उंचीनेही आणि आयुष्यातही. काल त्यांनी छावा बघितला आणि मला म्हणाल्या, 'उभे राहा, तुमची नजर उतरवायची आहे' त्या आधीपासूनच अशा प्रकारे त्यांचे माझ्यावर असेलेले प्रेम दाखवतात. त्या माझ्या आयुष्यात आहेत याचा मला खूप आनंद वाटतो."
मृणाल ठाकूरने व्हिडीओवर दिली ही प्रतिक्रिया
अभिनेत्री मृणाल ठाकूरने इंस्टाग्राम स्टोरीवर विकी कौशलचा आशाताई दृष्ट काढत असलेला व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यावर प्रतिक्रिया देत लिहिले की, नजर काढलीच पाहिजे. भारतीय चित्रपटाचे सर्वात सर्वोत्तम अभिनेता आहात तुम्ही. मी तुमची मोठी चाहती राहीन.