'तू मला खरोखर प्रेरणा देतेस'; ११ वर्षीय काव्या मजुमदारची भूमी पेडणेकरने केली प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 07:45 PM2022-01-14T19:45:10+5:302022-01-14T19:45:29+5:30

भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)ची सध्या इन्स्टाग्रामवर मुलाखतींची एक मालिका सुरू आहे. यामध्ये ती छोट्या हवामान योद्ध्यांसोबत गप्पा मारताना दिसते आहे.

'You really inspire me'; Bhumi Pednekar praises 11 year old Kavya Majumdar | 'तू मला खरोखर प्रेरणा देतेस'; ११ वर्षीय काव्या मजुमदारची भूमी पेडणेकरने केली प्रशंसा

'तू मला खरोखर प्रेरणा देतेस'; ११ वर्षीय काव्या मजुमदारची भूमी पेडणेकरने केली प्रशंसा

googlenewsNext

अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. खऱ्या आयुष्यात या प्रतिभावंत बॉलिवूड अभिनेत्रीने हवामान बदल आणि शाश्वत जीवनशैलीची गरज यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वाहून घेतले आहे. भूमीची सध्या इन्स्टाग्रामवर मुलाखतींची एक मालिका सुरू आहे. यामध्ये ती छोट्या हवामान योद्ध्यांसोबत गप्पा मारताना दिसते आहे. याचा भाग म्हणून भूमीने ११ वर्षीय काव्या मजुमदारशी संवाद साधला. 

लोकांना अधिक शाश्वत पद्धतीने जगून पृथ्वीच्या रक्षणात सहभागी होण्यास प्रोत्साहन देणारे ‘नज’ नावाचे एक अॅप काव्याने विकसित केले आहे. या अॅपमध्ये काही काळजीपूर्वक निवडलेली आव्हाने आहेत. ही आव्हाने यूजर्सना ऊर्जा व पाण्याची बचत करण्यास, पुनर्वापर व रिसायकलिंगला प्रोत्साहन देण्यास, आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगिकारण्यास तसेच वाया जाणारे अन्न व कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास प्रेरणा देतात.  काव्या मजुमदारने व्हाइटहॅट ज्युनियरमध्ये कोडिंग शिकत असून, तेथील तिच्या प्रकल्पाचा भाग म्हणून तिने ‘नज’ हे वर्तनात्मक अर्थशास्त्रातील नज सिद्धांतवर आधारित अॅप विकसित केले आहे. नज सिद्धांतामध्ये सकारात्मक सशक्तीकरण आणि अप्रत्यक्ष सूचना यांचा उपयोग करून व्यक्तीच्या वर्तनावर व निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकला जातो.   


हवामान बदलाची समस्या हाताळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो यावर काव्याला बोलते केल्यानंतर, भूमी, या छोट्याशा मुलीच्या बुद्धिमत्तेने अवाक झाली. ती काव्याला म्हणाली, “तू आज मला खरोखरंच प्रेरणा दिली आहेस. मी जेव्हा तुझ्यासारख्या छोट्या क्लायमेट वॉरियर्सशी बोलते, तेव्हा अजून खूप काही करण्यासारखे आहे, अशी आशा मला वाटते. हा प्रवास कठीण आहे, दीर्घ आहे पण आपण योग्य मार्गावर आहोत. आपल्या संभाषणाने आणखी बऱ्याच छोट्या प्रतिभावंतांना पुढे येण्यासाठी व या कामात योगदान देण्याची प्रेरणा मिळेल अशी आशा मला खरोखर वाटते.”
काव्याच्या भविष्यकाळातील योजना आणि पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल तिला वाटणारी कळकळ यांची छाप भूमीवर खूपच पडली. काव्याच्या हवामान बदलाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या या प्रयत्नात सहभाग घेण्याचे आवाहन तिने लोकांना केले. 

Web Title: 'You really inspire me'; Bhumi Pednekar praises 11 year old Kavya Majumdar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.