मध्यरात्री ऐश्वर्याच्या बंगल्यावर झाली पिझ्जा डिलेव्हरी, चिंता आणखीन वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 11:57 AM2020-07-17T11:57:27+5:302020-07-17T11:58:03+5:30

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली होती. 

You Will Be Definitely Shocked to know Aishwarya Rai Bachchan and aaradhya quarantine at home and man gets snapped delivering pizza | मध्यरात्री ऐश्वर्याच्या बंगल्यावर झाली पिझ्जा डिलेव्हरी, चिंता आणखीन वाढली

मध्यरात्री ऐश्वर्याच्या बंगल्यावर झाली पिझ्जा डिलेव्हरी, चिंता आणखीन वाढली

googlenewsNext


बीग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ अभिषेक बच्चनलाही कोरोनाचा संसर्ग झाला. सध्या नानावटी रूग्णालयात अमिताभ बच्चन यांच्यावर उपचार सुरू असून आता त्यांची तब्येत बरी आहे. अमिताभ यांची प्रकृती आता स्थिर आहे. अमिताभ आणि अभिषेक दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणं  होती. तर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या होम क्वारंटाईन झाले आहेत. बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. 

 

सुदैवाने जया बच्चन आणि ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसे इतर सदस्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला होता. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली होती. 

घरातच कोरोनाचा शिरकाव झाला तरीही ऐश्वर्याला मात्र परिस्थितीचे गांभिर्य दिसत नसल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री ऐश्वर्याच्या घरी पिझ्जा घेवून एक व्यक्ती आल्याचे फोटो समोर आले आहेत. आराध्याला पिझ्जा खाण्याची ईच्छा झाली म्हणून पिझ्जा मागवण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. यावरू परिस्थीती चिंतेची असूनही हवे तसे नियम पाळले जात नसून आणखीन समस्येला आमंत्रणच देणारी ही गोष्ट आहे. घरात राहून  फायदा नसून सुरक्षिततेचे नियम ऐश्वर्यानेच धाब्यावर बसवले असल्याचे प्रतिक्रीया आता समोर येत आहेत.

Web Title: You Will Be Definitely Shocked to know Aishwarya Rai Bachchan and aaradhya quarantine at home and man gets snapped delivering pizza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.