भाऊ-बहिणींसोबत असे दिसतात तुमचे लाडके स्टार्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2017 17:33 IST2017-05-30T12:03:56+5:302017-05-30T17:33:56+5:30
अबोली कुलकर्णी भाऊ-बहीण हे रक्ताचं नातं अतिशय पवित्र असतं. जीवाला जीव देणारं आणि मदतीला आयुष्यभर धावून येणारं एकमेव नातं ...
.jpg)
भाऊ-बहिणींसोबत असे दिसतात तुमचे लाडके स्टार्स!
भाऊ-बहीण हे रक्ताचं नातं अतिशय पवित्र असतं. जीवाला जीव देणारं आणि मदतीला आयुष्यभर धावून येणारं एकमेव नातं म्हणून भावा-बहिणीच्या रेशमी नात्याकडे पाहिले जाते. कधी भांडत तर कधी प्रेमानं हे नातं बालपणीचा प्रवास करत असतं. बालपणीचे दिवस हे आयुष्यात नेहमी स्मरणात राहणारे असतात. हे दिवस सुगंधित अत्तराप्रमाणे भुर्रकन उडून जातात. पण, स्मरणात कायम राहतात त्या या बालपणीच्या आठवणी. काळ सरला की, आपण या आठवणींना अल्बममधील फोटोंच्या माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न करत असतो. असाच काहीसा प्रयत्न आपले लाडके सेलेब्रिटी देखील करत असतात. खास तुमच्यासाठी भाऊ-बहिणींच्या फोटोंचा हा खास नजराणा....
रणबीर कपूर आणि रिधीमा कपूर
चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि त्याची बहीण रिधीम कपूर यांच्यातील भाऊ-बहिणीचे नाते हे अत्यंत वेगळे आहे. रिधीमा कधीच बॉलिवूडच्या झगमगाटात आली नाही. ती एक ज्वेलरी डिझायनर आहे. रणबीर अनेकदा रिधीमा आणि त्याच्या भाच्चीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्या तिघांमधील बाँण्डिंग ही खरंच खुप सुंदर आहे.
रणवीर सिंग आणि रितीका भवानी
रितीका भवानी ही रणवीर सिंगची मोठी बहीण आहे. तो तिच्या खुप जास्त क्लोज आहे. रणवीर त्याच्या यशामध्ये त्याच्या बहिणीचा खुप मोठा वाटा आहे, असे मानतो. रक्षाबंधनाच्या दिवशी तर तिने राखी बांधली की तो तिच्या पाया पडतो. असे हे भाऊ-बहीण एकत्र फारच क्यूट दिसतात.
दीपिका पादुकोण आणि अनिषा पादुकोण
दीपिका ही बॉलिवूडची दिवा आहे. अनिषा ही दीपिकाची खुप मोठी क्रिटिक आहे. दीपिकाच्या भूमिकांमधील चूका सर्वप्रथम तिची बहीणच दाखवून देते. ती एक चांगली बहीण तर आहेच पण त्याहीपेक्षा तिची एक खुप मोठी फॅन देखील आहे.
अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन
श्वेता बच्चन ही अमिताभ बच्चन यांची खुप लाडकी लेक़ मात्र, त्यांनी कधीही अभिषेक आणि श्वेता यांच्यात दुजाभाव केला नाही. हे दोघे नेहमीच एकमेकांचे समर्थक आणि चांगले मित्र असतात. अनेक सोहळ्यांना अभिषेक आणि श्वेता यांनी एकमेकांसोबत एन्ट्री केली आहे.
कॅटरिना कैफ आणि इसाबेल कैफ
बॉलिवूडची बार्बी डॉल कॅटरिना कैफ ही तिची बहीण इसाबेल क ैफ हिची फार जवळची बहीण आहे. या दोघी बहीण असण्यासोबतच चांगल्या मैत्रिणी आहेत. कॅ टरिना ही अनेकवेळा तिची बहीण इसाबेल कैफला तिच्यासोबत घेऊन येते. मध्यंतरी तिने इसाबेलच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीसाठीही प्रयत्न केले होते.
आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट
भट्ट कुटुंबीय हे बॉलिवूडमधील सर्वांत कूल कुटूंबांपैकी एक समजले जाते. त्यात आलिया आणि शाहीन या दोघी बहीणी एकमेकांसोबत मैत्रिणींप्रमाणेच राहतात. अशातच आलियाने एक घर घेतले असून त्या दोघी स्वतंत्र तिथेच राहतात. आलियाने खास त्या दोघींच्या आवडीनिवडींनुसार ते घर डिझाईन क रून घेतले आहे.