‘तुम्हारी सुलू’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 04:29 AM2018-02-22T04:29:46+5:302018-02-22T09:59:52+5:30

सोनी मॅक्स ही सोनी पिक्चर्स नेटवर्क्सची हिंदी सिनेमांची वाहिनी २५ फेब्रुवारी दुपारी १२ वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरमध्ये ‘तुम्हारी सुलू’च्या ...

'Your Supu's World Television Premiere' | ‘तुम्हारी सुलू’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

‘तुम्हारी सुलू’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

googlenewsNext
नी मॅक्स ही सोनी पिक्चर्स नेटवर्क्सची हिंदी सिनेमांची वाहिनी २५ फेब्रुवारी दुपारी १२ वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरमध्ये ‘तुम्हारी सुलू’च्या निमित्ताने उपनगरातील मध्यमवर्गीय भारतीयांच्या जीवनात डोकावण्याची संधी तुम्हाला देणार आहे. विद्या बालन आणि मानव कौल यांनी साकारलेली सुलोचना आणि मानव ही पात्रे सामान्यातून असामान्यत्व शोधण्याची कथा सांगताना निश्चितपणे तुमच्या मनावर छाप पाडतील. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘तुम्हारी सुलू’ ही मुंबईतील मध्यमवर्गीय परिसरात आपला पती अशोक व मुलगा यांच्यासोबत आनंदाने राहणार्‍या मध्यमवयीन गृहिणीच्या-सुलोचना दुबेच्या दैंनदिन जीवनावर आधारित कथा आहे. आपल्या कुटुंबासाठी आधीच सगळा त्याग केलेली सुलू ही एक उत्साही व स्वच्छंदी स्त्री आहे. तिच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात ती एका रेडिओ स्टेशनपाशी येऊन थांबते आणि तिचे जीवन एका रोलर-कोस्टर राईडमध्ये बदलते. हे काम स्वीकारण्याचा निर्णय तिच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणतो कारण एका रात्रीत मिळालेली प्रसिद्धी आणि आणि तिच्या कुटुंबाप्रतीच्या जबाबदार्‍या यात समतोल साधण्याची कसरत आता तिला करावी
लागणार असते.

तुम्हारी सुलू हा सिनेमा म्हणजे खरंतर आयुष्याचं एक चित्र आहे. पण मला पर्सनली असं वाटतं की ही एक सुखद फिल्म आहे. कोणत्याही परिस्थितीत नेहमी आनंदी राहणार्‍या सुलू नावाच्या स्त्रीची ही गोष्ट आहे. ती नेहमी हसतमुख, आनंदी असते जणू आयुष्याकडे बघण्याचा हा प्रेमळ दृष्टिकोन तिने नुकताच मिळवला आहे. आयुष्यात जिथे कुठे आहेत, त्याबाबत समाधानी असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची देखील ही गोष्ट आहे, अर्थात त्यांच्या प्रत्येकाची स्वप्नं आहेत पण जीवनातील साध्या-छोट्या वाटणार्‍या गोष्टी त्यांच्यालेखी महत्त्वाच्या आहेत.

Web Title: 'Your Supu's World Television Premiere'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.