‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थला चक्क मृत घोषित केलं; तक्रार केल्यावर युट्यूबनं हे गजब उत्तर दिलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 10:52 AM2021-07-19T10:52:16+5:302021-07-19T10:53:48+5:30
सिद्धार्थला व्हिडिओंबद्दल कळल्यावर त्यानं यूट्यूबकडे तक्रार केली. पण युट्यूबनं दिलेलं उत्तर ऐकून क्षणभर हसावं की रडावं हेच कळेनासं झालं.
सोशल मीडियावर क्षणांत अफवा पसरतात. बी-टाऊनचे अनेक स्टार्स या अफवांचे शिकार ठरले आहेत. मागच्या काही दिवसांत अनेक स्टार्सच्या निधनाच्या अफवा पसरल्या. आता या यादीत ‘रंग दे बसंती’ (Rang De Basanti ) फेम अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) याचंही नाव झळकलं. युट्यूबवर अभिनेता सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त वाºयाच्या वेगानं व्हायरल झालं. सिद्धार्थचं निधन झाले असून सिद्धार्थ हा जगाचा निरोप घेणारा सर्वाधिक कमी वयाचा साऊथ इंडियन सेलिब्रिटी असल्याचा दावा या व्हिडीओत करण्यात आला होता.
एका फॅननं या व्हिडीओचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये अभिनेत्री सौंदर्या, आरती अग्रवाल आणि सिद्धार्थ दिसत आहेत.सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त बघून चाहत्यांना धक्का बसला. अनेक तास हा गोंधळ सुरू होता. अखेर सिद्धार्थनं स्वत: पुढे येत, त्याच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचं स्पष्ट केलं. तेव्हाकुठे चाहत्यांच्या जीवात जीव आला.
I reported to youtube about this video claiming I'm dead. Many years ago.
— Siddharth (@Actor_Siddharth) July 18, 2021
They replied "Sorry there seems to be no problem with this video".
Me : ada paavi 🥺 https://t.co/3rOUWiocIv
युट्यूबचं गजब उत्तर
अभिनेत्री सौंदर्याचं 2004 साली निधन झालं. आरती अग्रवाल हिनं 2015 मध्ये जग सोडलं. पण सिद्धार्थ अजूनही जिवंत आहे. सिद्धार्थला या व्हिडिओंबद्दल कळल्यावर त्यानं यूट्यूबकडे तक्रार केली. पण युट्यूबनं दिलेलं उत्तर ऐकून क्षणभर हसावं की रडावं तेच सिद्धार्थला कळेना. होय, ‘आम्हाला संबंधित व्हिडिओमध्ये कोणतीही समस्या दिसत नाही,’ असं उत्तर युट्यूबनं दिलं. युट्यूबचं हे उत्तर वाचून सिद्धार्थनं कपाळावर हात मारून घेतला नसेल तर नवल. स्वत: टिष्ट्वट करून त्यानं ही माहिती दिली आहे.
सिद्धार्थ हा साऊथचा लोकप्रिय चेहरा आहे. तामिळ, तेलगू सिनेमात त्यानं काम केलं आहे. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बॉयज’ हा त्याचा पहिला सिनेमा होता. यानंतर मणिरत्नम यांच्या ‘आयुथा एझुथा’ या सिनेमात त्याला संधी मिळाली. काही तामिळ सिनेमे केल्यानंतर त्याने तेलगू सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला. आमिर खानसोबत ‘रंग दे बसंती’ या सिनेमानं सिद्धार्थला नवी ओळख दिली. लवकरच महासमुद्रम या सिनेमात दिसणार आहे.