ऐकलं का? युट्युबर कॅरी मिनाटी बॉलिवूडमध्ये करतोय डेब्यू, अजय-अमिताभच्या या सिनेमात लागली वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 02:32 PM2020-12-18T14:32:01+5:302020-12-18T14:37:41+5:30
माहित नसेल तर जाणून घ्या कोण आहे कॅरी मिनाटी
भारतातील सर्वात लोकप्रिय युट्युबर कॅरी मिनाटी हे नाव तुम्ही ऐकले असेलच. तर आता हाच, युट्युबर्सचा लाडका कॅरी लवकरच मोठ्या पडद्यावर डेब्यू करताना दिसणार आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका सिनेमातून कॅरीचा डेब्यू होतोय. या सिनेमाचे नाव आहे, ‘Mayday ’. यात अजय देवगण व रकुल प्रीत सिंग लीड रोलमध्ये आहेत.
कॅरी मिनाटीने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला. त्याने सांगितले की, माझा भाऊ व बिझनेस हेड दीपकला को-प्रोड्यूसरचा फोन आला होता आणि चित्रपटाबद्दल चर्चा सुरु आहे. यात मी माझीच म्हणजे कॅरी मिनाटीची भूमिका साकारणार असल्याने मला माझ्या कम्फर्ट झोनबाहेर येण्याची गरज नाही.
अमिताभ, अजय देवगण अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, या सिनेमात मला माझीच भूमिका साकारायची असल्याने मी होकार दिला. माझ्यासाठी माझीच भूमिका साकारणे सोपे होते. अमिताभ व अजय देवगण यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल, इतकीच अपेक्षा आहे. सिनेमात काम केल्याने माझ्या फॅन्सची संख्या मात्र वाढणार आहे.
कोण आहे कॅरी मिनाटी?
नव्या पिढीला कॅरी मिनाटी हे नाव नवे नाही. तो युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर. कॉमेडियन, रॅपर आणि आता युट्यूब स्टार अशी त्याची ओळख आहे. फरीदाबादचा या अजयचे युट्यूबवर CarryMinati व CarryIsLive अशी दोन चॅनल्स आहेत़
युट्यूब करिअरसाठी कॅरीने मध्येच शिक्षण सोडले. होय, अगदी 12 वीची परीक्षा न देण्याचा निर्णय त्याने घेतला. अर्थात पुढे त्याने हे शिक्षण पूर्ण केले, हा भाग वेगळा.
अजय नागर कॅरी मिनाटी नावाने युट्यूबवर लोकप्रिय आहे. युट्यूबवर लोकांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ शेअर करणे शिवाय लाईव्ह गेमिंगसाठी तो ओळखला जातो.
वयाच्या 10 व्या वर्षापासून कॅरीने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणे सुरु केले होते. अगदी सुरुवातीला सनी देओलची मिमिक्री करणारा व्हिडीओ त्याने पोस्ट केला होता. 2014 मध्ये त्याने कॅरीमिनिटी हे मूळ युट्यूब चॅनल सुरु केले. 2017 मध्ये CarryIsLive आणखी एक युट्यूब चॅनल उघडले.
कॅरीने जानेवारी 2019 मध्ये युट्यूबपर Pewdiepie विरोधात 'Bye Pewdiepie' नावाने एक डिस गाणे साद केले होते. ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. 24 तासांत या गाण्याला 5 मिलियन व्ह्युज मिळाले होते. 2019 या सालात टाईम मॅगझिनद्वारा नेक्स्ट जनरेशन लीडर्स 2019 व्या यादीत कॅरी दहाव्या क्रमांकावर होता. इनोव्हेटिव्ह करिअर करणा-या युवांची ही यादी टाईम मॅगझिन दरवर्षी प्रसिद्ध करते.
युट्यूबसाठी कॅरीने सोडली होती 12ची परीक्षा, Carryबाबत माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घ्या