Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:00 PM2024-09-20T12:00:29+5:302024-09-20T12:01:16+5:30
२०१७ साली 'बियॉन्ड द क्लाऊड्स' या सिनेमातून पदार्पण केलं होतं. मात्र 'युध्रा' हा तिचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे.
साऊथ स्टार मालविका मोहनन (Malavika Mohanan) हिंदीत पदार्पण करत आहे. 'युध्रा' हा तिचा पहिलाच हिंदी सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. सिनेमात तिची आणि सिद्धांत चतुर्वेदीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिवकाने याआधी २०१७ साली 'बियॉन्ड द क्लाऊड्स' या सिनेमातून पदार्पण केलं होतं. मात्र 'युध्रा' हा तिचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. याच सिनेमाची निवड का केली याबद्दल मालविकाने खुलासा केला.
मालविका मोहनन मुंबईतच लहानाची मोठी झाली. मात्र तिची जादू साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पाहायला मिळाली. तिने पदार्पणातच रजनीकांत, थलपति विजय यांच्यासोबत काम केलं. आता हिंदीतील पदार्पणाबाबत ती म्हणाली, "याआधी बऱ्याच स्क्रीप्ट्स आल्या. पण मी विचार केला की एका वर्षात २-३ सिनेमे नाही केले तरी ठीक आहे. स्क्रीप्ट आणि भूमिका आवडणं जास्त महत्वाचं आहे. युध्रा एक्सेल एंटरटेन्मेंटचा आहे त्यामुळे या सिनेमाची ऑफर येताच मी होकार दिला. कारण मी या प्रोडक्शन हाऊसची चाहती आहे. तसंच सिद्धांतचा गल्ली बॉय मधला परफॉर्मन्स आवडला होता."
ती पुढे म्हणाली, "सिनेमात आम्ही तरुण कलाकार होतो. मला माझी भूमिकाही आवडली. अभिनेत्री आहे म्हणून केवळ बाहुली बनून राहील अशी ती भूमिका नाही. माझ्या भूमिकेचाही वेगळा अँगल आहे. अॅक्शन सीक्वेन्स आहेत, स्वत:ला वाचवण्याची धडपड आहे. हेच सगळं मला आवडलं आणि मी लगेच होकार दिला."
'युध्रा' सिनेमा आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी, मालविका मोहनन यांच्याशिवाय राघवचीही भूमिका आहे. तो यामध्ये खलनायक आहे. तसंच राम कपूर, गजराज राव हे देखील झळकले आहेत.