बोल्ड अन् बिनधास्त सिद्धांत चतुर्वेदी! अंगावर काटा आणणारा रक्तरंजित थरार, 'युध्रा'चा ट्रेलर पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 01:48 PM2024-08-30T13:48:47+5:302024-08-30T13:49:20+5:30

सिद्धांत चतुर्वेेदीच्या आगामी 'युध्रा'चा ट्रेलर रिलीज झालाय (yudhra, siddhant chaturvedi)

yudhra trailer starring Siddhant Chaturvedi raghav juyal malvika mohnan | बोल्ड अन् बिनधास्त सिद्धांत चतुर्वेदी! अंगावर काटा आणणारा रक्तरंजित थरार, 'युध्रा'चा ट्रेलर पाहाच

बोल्ड अन् बिनधास्त सिद्धांत चतुर्वेदी! अंगावर काटा आणणारा रक्तरंजित थरार, 'युध्रा'चा ट्रेलर पाहाच

सध्या बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक भन्नाट विषयांवरील सिनेमे रिलीज होत आहेत. या सिनेमांना प्रेक्षकांचीही चांगली पसंती मिळतेय. बॉलिवूडमध्ये काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'किल' सिनेमाने अनपेक्षितरित्या प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळवलं. किलमधील रक्तरंजित थरारक कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. याच पद्धतीचा आणखी एक नवा सिनेमा बॉलिवूडमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. सिद्धांत चतुर्वेदीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचं नाव आहे 'युध्रा'.

'युध्रा'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

सिद्धांत चतुर्वेदीची प्रमुख भूमिका असलेला 'युध्रा'चा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये दिसतं की, सिद्धांत चतुर्वेदी आर्मी ऑफिसर असतो. पण काही कारणास्तव तो जेलमध्ये असतो. सिद्धांत शॉर्ट टेंपर असलेला दिसते. त्याला कोणत्याही गोष्टीचा पटकन राग येतो. त्यामुळे नडणाऱ्या लोकांशी मारामारी करुन त्यांना धडा शिकवण्याचं काम करतो. पुढे सिद्धांतला एका मिशनला पार पडावं लागतं. हे मिशन पार पडताना त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. हे मिशन काय? आर्मी ऑफिसर असलेला सिद्धांत जेलमध्ये का असतो? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं सिनेमा पाहूनच मिळतील.


या दिवशी रिलीज होणार 'युध्रा'

सिद्धांत चतुर्वेदी या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय डान्सर आणि अभिनेता राघव जुयाल खलनायकाची भूमिका साकारणार आहे. राघवने याआधी गाजलेल्या 'किल' सिनेमातही खलनायकाची भूमिका साकारली होती. 'युध्रा'मध्ये गजराज राव, मालविका मोहनन, राम कपूर हे कलाकारही विशेष भूमिकेत झळकणार आहेत. फरहान अख्तरने या सिनेमाची निर्मिती केली असून २० सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title: yudhra trailer starring Siddhant Chaturvedi raghav juyal malvika mohnan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.